Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ एप्रिल, २०२५
Home
/
Unlabelled
/
बहाळ ग्रामपंचायतीला ग्रामसभेचा विसर ,ग्रामसेवक येईना, कागदपत्रासाठी नागरीकांना करावी लागते फिरफिर
बहाळ ग्रामपंचायतीला ग्रामसभेचा विसर ,ग्रामसेवक येईना, कागदपत्रासाठी नागरीकांना करावी लागते फिरफिर
प्रतिनिधी बहाळ येथील सर्वाधिक लोकसंख्खेच्या गाव असलेल्या गावात ग्रामसेवक २६ जानेवारीला घेण्यात येणारी ग्रामसभा दोन महिने उलटूनही अद्याप पर्येंत घेतली नसल्याने ग्रामसेवक पंकज चव्हाण याचा मनमानी कारभार सध्या बहाळ ग्राम पंचायतीत सुरु आहे .तसेच ग्रामपंचायतीत दर महिन्याला मासिक मिटिंग घेण्यात येते मात्र फेब्रुवारीत घेण्यात आलेली वार्षिक मिटिंग कोरम अभावी तहकूब करण्यात आली त्यानंतर सात दिवसाच्या आत मिटिंग घेण्यात येणे अनिवार्ये होती मात्र ती घेतली नाही .तीच तहकूब मिटिंग मार्च महिन्यात सात तारखेला घेण्यात आली. सात दिवसापेक्षा जास्त दिवसानंतर तहकूब मिटिंग घेणाऱ्या ग्रामसेवकावर कार्येवाही होईल का ? तसेच मार्च महिन्याची मासिक मिटिंग का घेतली गेली नाही. सदरील ग्रामसेवकाची मनमानी सुरु असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.
गावाची स्थानिक स्वराज्य संस्थेची महिन्याची मिटिंग म्हणजे ग्रामपंचायत मासिक सभा असते गावचा ग्रामपंचायतीचा कारभार सुरळितपणे चालण्यासाठी वर्षातील प्रत्येक महिन्यात १ मासिक सभा घेणे बंधनकारक असते.गावाचे विकासकामे त्याचबरोबर महिन्यातील कारभार जमा खर्च ,ठराव या सर्व बाबीची विचार घेण्यासाठी मासिक सभा घेतली जाते मात्र त्याकडेच ग्रामसेवक पंकज चव्हाण दुर्लक्ष करीत आहेत. तसेच आठ मार्च रोजी घेण्यात येणारी महिला ग्रामसभा देखील घेतली गेली नाही . ग्रामसेवक येत नसल्याने नागरिकांना लागणारे कागदपत्रे मिळत नसल्याने फिर फिर पुरत आहे. कागदपत्र मिळत नसल्याने नागरिक संताप करीत आहेत.या ग्रामसभा बाबत गाव कारभारी यांना ग्रामसेवकांनी व अधिकाऱ्यांनी सांगितले नाही का ? ग्रामस्थांना या बाबतीत अंधारात ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे का ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. ग्रामसभा न घेतलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर कारवाई होणार आहे का ? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
विशेषत...
येथील ग्रामसेवकाला चार गावांचा पदभार देण्यात आला आहे तालुक्यात एकमेव ग्रामसेवक त्याना चार गावांचा पदभार देण्यात आल्याने त्याच्यावर वरिष्ठ्यांचे विशेष प्रेम असल्याचे बोलले जात आहे. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्याच्यावर काय कार्येवाही होते का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
प्रतिक्रिया...
१] सरपंच आणि उपसरपंच पती यांच्या कुरघोडीच्या राजकारणात गावातील समस्याकडे दुर्लक्ष झाले आहे ठरवून दिलेल्या वाराला देखील ग्रामसेवक येत नसल्याने गावातील कामे ठप्प झाली आहेत तसेच मार्च महिन्यात घेण्यात येणारी मासिक मिटिंग व २६ जानेवारीला घेण्यात येणारी ग्रामसभा देखील घेतली नाही .त्यामुळे नागरिकांना विविध योजनेची माहिती मिळाली नसल्याने योजनेपासून वंचित ठेवले आहे .गावात समस्या भरपूर असताना ग्रामसेवक व सरपंच यांचे दुर्लक्ष आहे. नेमीचंद महाजन ग्रामपंचायत सद्स्य ,बहाळ
२] सदर ग्रामपंचायतीची विस्तार अधिकारी यांना पाठवून सदर ग्रामसेवकाची चौकशी करण्यात येईल दोषी आढळल्यास त्यांच्यावर कार्येवाही करण्यात येईल. गटविकास अधिकारी अन्सार शेख ,चाळीसगाव
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
जळगाव प्रतिनिधी :- पाचोऱ्यात ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या घटनेची दखल...
-
राज्याचे बजेट सादर झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीचे चित्र अत्यंत स्पष्ट झाले आहे. जमा आणि खर्चाचा ताळमेळ साधणे आता कठीण होणार असल्याचे लक्षात य...
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील पांडू बापू माळी मुनिसिपल हायस्कूल शिरपूर या ठिकाणी १९९७/९८ या शैक्षणिक वर्षाच्या दहावीच्या बॅचने दि. २३ मार्...
-
शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील आंबे-रोहिणी परिसरात बुधवारी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या मुंबईच्या पथकाने पुणे आणि नागपूर प्राद...
-
शिरपुर (प्रतिनिधी) उदयपूर (राजस्थान) येथील महाराणा प्रतापसिंह यांचे ७६ वे वंशज मेवाड़, उदयपूर राजघराण्याचे श्री जी हुजूर अरविंदसिंहजी मेवाड ...
-
प्रतिनिधी बहाळ येथील सर्वाधिक लोकसंख्खेच्या गाव असलेल्या गावात ग्रामसेवक २६ जानेवारीला घेण्यात येणारी ग्रामसभा दोन महिने उलटूनही अद्याप पर्य...
-
मुंबई, दि. २८:- राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां...
-
थाळनेर (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावातील दारूबंदीसाठी महिलांनी घोषणा देत ग्रामपंचायत वर व पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा नेत तक्रारी...
-
मालपुर प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे आवळ्याचे शेता जवळ हायवे रोडावर खड्डे पडले असुन हा रस्ता दोंडाईचा कडून साक्री कडे जाणाऱ्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा