Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ९ एप्रिल, २०२५

व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाची वार्षिक सभा संम्पन्न...!


शिंदखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे. 

शिंदखेडा प्रतिनिधी :- दिनांक 6एप्रिल रोजी व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाची वार्षिक सभा शासकीय विश्राम गृह शिंदखेडा येथे खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष प्रदीप दीक्षित यांच्या अध्यक्षतेत संम्पन्न झाली सभासद नोंदणीपासून ते विविध विषयांवर चर्चा झाली महिला पत्रकार सहभागी व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले शिंदखेडा येथे पत्रकार भवन असावे यावरही चर्चा झाली नूतन अध्यक्ष पदाची जबाबदारी पुन्हा प्रा प्रदीप दीक्षित यांनाच देण्यात आली. 
    
प्रसंगी भुषण पवार प्रकाशनाना चौधरी दीपक चौधरी यासंह रवींद्र पाटील मनोज गुरव महेश गुजराथी संजयकुमार महाजन जितेंद्र सूर्यवंशी लखेसिंग गिरासे  महेंद्र मराठे हिम्मत निकम प्रभाकर धनगर महेंद्रसिंग गिरासे दिलीप चौधरी प्रा चंद्रकांत डागा प्रा भैय्या मंगळे उत्तम नेरकर आसिफ पठाण महिला पत्रकार प्रतिनिधी सौ शोभा पाटील उपस्थित होतें सूत्रसंचालन उपाध्यक्ष भुषण पवार यांनी केले प्रकाश चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम प्रसंगी श्री प्रभुरामचंद्राच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले 
     
अध्यक्षीय मनोगतात प्रा प्रदीप दीक्षित म्हणाले व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या माध्यमातून आपणास पत्रकारीतेचा आगळा वेगळा ठसा समाजात प्रस्थापित करायचा आहे असे आवाहन केले लौकरच नूतन कार्यकारिणी गठीत करून व्हाईस ऑफ मीडियाच्या वरिष्ठठांकडे दाखल केली जाणार आहे अत्यन्त खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संम्पन्न झाला



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध