Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

दोंडाईचा ते मालपूर रस्त्यावर खड्डेच खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.



मालपुर प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे आवळ्याचे शेता जवळ हायवे रोडावर खड्डे पडले असुन हा रस्ता दोंडाईचा कडून साक्री कडे जाणाऱ्या हायवे रस्त्यावर जोडला गेला आहे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी मोटार सायकल चालक व चालक मालक संघटने कडुन केली जात आहे.दोंडाईचा ते मालपुर हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून साक्री जाता येत दोंडाईचा भागाकडून येणारे अनेक प्रवासी या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे.अपघात होण्याचा धोकादायक निर्माण झाला आहे मोटार सायकल चालवणे सुध्दा कठीण झाले आहे.वारंवार मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.या विषयाकडे लोकप्रतिनिधींनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध