Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

थाळनेर पोलीसांनी गावठी हात भट्टीवर छापा कारवाई हात भट्टया केल्या उध्दवस्त



शिरपूर प्रतिनिधी:-थाळनेर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि. श्री. शत्रुघ्न पाटील यांना गुप्तबातमीव्दारा मार्फत बातमी मिळाली की, थाळनेर तसेच थाळनेर गावा लगत असलेल्या वाठोडा गावात तापी नदीचे काठालगत बाभळीच्या झुडपांचे मधोमध गावठी दारु बनविण्याच्या भट्ट्या चालु आहे. त्यावरुन सपोनि. शत्रुघ्न पाटील यांचे सह पोसई/समाधान भाटेवाल, पोहेकॉ/३९१ विजय ठाकुर, पोहेकॉ/०७ भुषण रामोळे, पोहेकॉ/१३ रईस शेख, पोकॉ/१६३३ उमाकांत वाघ, पोकॉ/१६९६ किरण सोनवणे, चापोकों/दिलीप मोरे, पोकॉ/धनराज मालचे अशांचे पथक तयार केले. पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच दोन पंच अशांसह आज दिनांक ०८/०४/२०२५ रोजी सकाळी ०५.३० वाजता थाळनेर तापी नदीचे काठावर पाहत पाहत जात असतांना ४/५ ठिकाणी गावठी दारु बनविण्याच्या भट्टया दिसुन आल्याने त्या उध्दवस्त करण्यात आले. 

त्यानंतर थाळनेर पासुन पुढे गेल्यानंतर थाळनेर गावाला लागुन असलेल्या वाठोडा गावाचे शिवारात तापी नदी काठी काटेरी बाभळीच्या झुडपांमध्ये वेगवेगळया दोन ठिकाणी काही इसम गावठी दारुच्या भट्ट्या चालवितांना दिसुन आल्याने त्यांचेवर छापा कारवाई करुन त्यांना जागीच पकडले त्यांना त्याचे नांव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नांव १) कैलास दुर्यधन भिल २) संजय धनसिंग पवार ३) राजेंद्र उदेसिंग भिल सर्व रा. वाठोडा ता. शिरपुर असे सांगुन सदर गावठी हात भट्टी त्यांचे मालकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे ताब्यातुन एकुण ०२,०३,१००/- रुपये किंमतीचा (अक्षरी- दोन लाख तीन हजार शंभर रुपये) मुद्देमाल मिळुन आला. सदर भट्टया व त्यासाठी वापरले जाणारे साहित्य (निळे ड्रम, पत्र्याचे ड्रम, कच्चा माल) जागीच उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच आरोपी व त्यांचे ताब्यातील दोन मोटार सायकली पोलीस स्टेशनला जमा करुन त्यांचे वर प्रोव्हिबिशन कायदयान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक सो श्री.शश्रीकांत धिवरे,मा.अपर पोलीस अधीक्षक सो श्री.किशोर काळे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो. श्री.सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक थाळनेर पो.स्टे प्रभारी श्री. शत्रुघ्न पाटील, पोसई/समाधान भाटेवाल, पोहेकॉ/३९१ विजय ठाकुर, पोना/०७ भुषण रामोळे, पोहेकॉ/१३ रईस शेख, पोकॉ/१६३३ उमाकांत वाघ, पोकॉ/१६९६ किरण सोनवणे, पोकॉ/१४५८ धनराज मालचे, चापोकों/दिलीप मोरे अशांनी मिळून केली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध