Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ एप्रिल, २०२५

महाराष्ट्र राज्य साखर उद्योग शुगर टास्क फोर्स चा राज्य संचालक पदी अतूल माने पाटील यांची निवड



 महाराष्ट्र राज्य साखर उद्योगासाठी कार्यरत शुगर टास्क फोर्सच्या राज्य कोअर कमिटीच्या संचालकपदी महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे मार्गदर्शक आणि माने पाटील इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन टेक्नॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष अतुलनाना माने पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही निवड ऊस क्षेत्रात त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत करण्यात आली असून, यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.अतुलनाना मानेपाटील हे ऊस उत्पादकांच्या समस्या समजून घेणारे, अभ्यासू व तळमळीचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना मानेपाटील म्हणाले, “ही संधी ऊस उत्पादकांच्या अडचणी केंद्रस्थानी ठेवून उपाययोजना राबवण्यासाठी वापरणार आहे.शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी टास्क फोर्समध्ये ठाम भूमिका घेणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध