Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

मालपुर येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन



मालपुर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे:-
शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे आज सकाळी ९ वाजता क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने महात्मा फुले चौक येथे अभिवादन करण्यांत आले. महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. फुले यांच्या पुतळ्यास सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महावीरसिंह रावल यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. या वेळी माजी पं. स. सदस्या पुष्पाकुंवर रावल, माजी सरपंच तथा माजी. जिल्हा परिषद सदस्य हेमराज नाना पाटील, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रावण आहिरे, माजी सरपंच मच्छिंद्र शिंदे, लक्ष्मण पानपाटील, पोलीस पाटील बापु बागूल, माजी उपसरपंच प्रकाश पाटील, ग्रामविकास अधिकारी तुषार बी साळवे, ॲड. पंकज पाटोळे, कैलास माळी, अमित पवार, जगदिश पाटील, दामोदर आहिरे, भटु रावल, सुरेश पाटोळे, किसन पत्रकार गोपाल कोळी, गोसावी, सुरेश इंदवे,  इ रोहिदास खलाणे, पत्रकार प्रभाकर अडगाळे,
काशिनाथ आहिरे आदी उपस्थित होते. ॲड पंकज पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केले.सायंकाळी पाच वाजता शोभायात्रा काढण्यात आली. तुकाराम माळी यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग सूर्यवंशी यांनी आभार मानले व यावेळी समाज बांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध