Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

मेव्हण्याने केला शालकाचा खून



शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक

अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शेवगे ता.पारोळा येथील मेव्हण्याने अमळनेर तालुक्यातील खवशी येथील एकाच्या मदतीने शालकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली. दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली असून न्यायालयाने ३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे

धुळे जिल्ह्यातील फागणे येथील समाधान शिवाजी पाटील याचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी १९ एप्रिल रोजी पारोळा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग विसावे, पोहेकॉ सुनील हटकर,संजय पाटील,अनिल राठोड,अभिजीत पाटील यांनी सखोल तपास केला असता यात काहीतरी वेगळे असल्याचं जाणवले.यात मयताचा शालक संदीप भालचंद्र पाटील (वय ४०) (रा.शेवगे ता.पारोळा) तसेच चंद्रदीप आधार पाटील (वय ४५) (रा.खवशी ता.अमळनेर) यांनी कट रचून समाधान पाटील याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.संदीप पाटील याने आपला शालक समाधान पाटील याच्या नावावर विमा पॉलिसी काढून ठेवल्याचे उघडकीस आले तसेच अपघातात वापरलेली स्कुटी एम एच ५४ ए ९५१३ ही देखील पूर्णपणे इन्शुरन्स होती.समाधान चा खून करून त्याची विमा पॉलिसी रक्कम व दुचाकीची विमा रक्कम आपल्याला मिळावी या हव्यासापोटी समाधान चा खून केल्याचे उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोघा आरोपीना अमळनेर तालुक्यातून अटक केली आहे. 

पोलिसांनी कसून चौकशी केली असता समाधान याला संदीप व चंद्रदीप यांनी धुळे ते जळगाव जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याच्या कडेला घेऊन जाऊन अंधारात लोखंडी रॉड ने मारहाण करून त्याला जीवे ठार केल्याची कबुली दोघी आरोपींनी दिली आहे.पुढील तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध