Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५
शिरपूर पंचायत समिती येथे ९ वर्षांपासून रोहयोचे दाखल अर्ज धुळखात पडून;
शिरपूर प्रतिनिधी:- क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेची लाभार्थ्यांना लाभ देण्याची बिडिओ प्रदीप पवार यांना निवेदनाद्वारे मागणी पंचायत समिती,शिरपूर येथे रोजगार हमी योजनेचे सन २०१६ ते २०२५ पर्यंत ९ वर्षांपासून ४,५०० पेक्षा जास्त अर्ज प्रलंबित असल्याने आज रोजी क्षत्रिय शिवराणा कृषी विज्ञान मंडळ व बहुउद्देशिय संस्था,आढे ता.शिरपूर जि.धुळे या संस्थेचा वतीने गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांना निवेदन दिले.त्यावेळेस त्यांनी आश्वस्त केले कि,सर्व प्रलंबित अर्ज लवकरच निकाली काढून पात्र लाभार्थी यांना लवकरात लवकर लाभ देण्यात येईल.
पंचायत समिती,शिरपूर येथे एवढे मोठे अर्ज प्रलंबित असणे तालुक्यासाठी धक्कादायक व अशोभनीय बाब आहे.रोजगार हमी योजनेचा वैयक्तिक लाभाचा शेततळे,गांडूळ खत,वैयक्तिक शौचालय,बांधावरील वृक्ष लागवड,
गोठ्याचे व मुत्रखड्डा आणि गव्हाण,
नाडेप कंपोस्ट,कंपोस्ट पीट,वैयक्तिक विहीर,फळबाग लागवड,शेळ्यांसाठी निवारा,कुक्कुटपालन शेड आदी योजनांसाठी तालुक्यातील अल्पभुधारक शेतकरी,भूमिहीन व पात्र लाभार्थी यांनी मोठ्या आशेने पंचायत समिती,शिरपूर अनेक अर्ज दाखल केलेले आहेत.योजनेचा लाभ मिळत नसल्याने अनेक लाभार्थी नाराजी व संताप व्यक्त करीत आहेत.त्या अर्जात ठराव दिलेले ग्रामपंचायत सरपंच यांचा कालावधी संपलेला आहे.
ग्रामसेवक,पशुधनाचा दाखला देणारे पशुधन विकास अधिकारी यांच्या बदल्या झालेल्या आहेत.तसेच ७/१२ उतारा व ८ अ यांचा कालावधी देखील संपलेला आहे.यामुळे अर्जाची स्वीकृती झाल्यास भविष्यात लाभार्थी यांना अनेक अडचणी येणार आहेत.यासाठी संबंधित लाभार्थी यांनी अजून किती वर्ष आपल्या हक्काचा योजनेचा लाभ घेण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
भविष्यात ही योजना बंद झाल्यास पात्र लाभार्थी वंचित राहिल्यास याला जबाबदार कोण असणार? दररोजचा अर्जांचा संख्येत वाढ होत आहे.
याकरिता संस्थेचा वतीने आपणास विनंती करण्यात येते कि,पात्र लाभार्थी यांना लवकरात लवकर लाभ द्यावा.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
Newer Article
दोंडाईचा ते मालपूर रस्त्यावर खड्डेच खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.
Older Article
थाळनेरला दारूबंदीसाठी महिलांनी ग्रामपंचायत व पोलिस स्टेशनवर नेला धडक मोर्चा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनीधी:- गणेश चव्हाण अमळनेर : शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथून प्रतिवर्षाप्रमाणे शनिवारी सायंकाळी ७ वाजता सप्तशृंगी गडावर लावण्यासाठी रे...
-
जळगाव प्रतिनिधी :- पाचोऱ्यात ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या घटनेची दखल...
-
शिरपूर प्रतिनिधी : एस. व्ही. के. एम. संचालित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर शिरपूर आणि रसिकलाल पटेल मेड...
-
राज्याचे बजेट सादर झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीचे चित्र अत्यंत स्पष्ट झाले आहे. जमा आणि खर्चाचा ताळमेळ साधणे आता कठीण होणार असल्याचे लक्षात य...
-
शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील आंबे-रोहिणी परिसरात बुधवारी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या मुंबईच्या पथकाने पुणे आणि नागपूर प्राद...
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील पांडू बापू माळी मुनिसिपल हायस्कूल शिरपूर या ठिकाणी १९९७/९८ या शैक्षणिक वर्षाच्या दहावीच्या बॅचने दि. २३ मार्...
-
शिरपुर (प्रतिनिधी) उदयपूर (राजस्थान) येथील महाराणा प्रतापसिंह यांचे ७६ वे वंशज मेवाड़, उदयपूर राजघराण्याचे श्री जी हुजूर अरविंदसिंहजी मेवाड ...
-
संकल्प सेवा फाऊंडेशन धनवाडी चे संस्थापक अध्यक्ष डॉ. राहुल भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त सायबर साक्षरता व जनजागृती अभियान 365 दिवस काला...
-
प्रतिनिधी बहाळ येथील सर्वाधिक लोकसंख्खेच्या गाव असलेल्या गावात ग्रामसेवक २६ जानेवारीला घेण्यात येणारी ग्रामसभा दोन महिने उलटूनही अद्याप पर्य...
-
मुंबई, दि. २८:- राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा