Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ एप्रिल, २०२५

तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल व रसिकलाल पटेल मेडीकल फाऊन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६ एप्रिल रोजी 'आरोग्य रक्षक' रुग्ण वाहिका लोकार्पण सोहळा



शिरपूर प्रतिनिधी : एस. व्ही. के. एम. संचालित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर शिरपूर आणि रसिकलाल पटेल मेडीकल फाऊन्डेशन ॲन्ड रिसर्च इंस्टीट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने 'आरोग्य रक्षक' रुग्ण वाहिका लोकार्पण सोहळा ६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

प्रभु श्रीराम नवमीच्या शुभ मुहुर्तावर सर्व रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्य सेवेत सुसज्ज अशी कार्डियाक 'आरोग्य रक्षक' रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विर्लेपार्ले केळवणी मंडळ सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल राहतील. आमदार काशिराम दादा पावरा यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न होईल.

सदर कार्यक्रम रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता आर.सी.पटेल मेन बिल्डिंग येथे राजगोपाल भंडारी हॉल मध्ये संपन्न होत असून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध