Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ एप्रिल, २०२५

बसमधून महिलेच्या ६५ हजाराच्या बांगड्या चोरल्या


प्रतिनीधी:- गणेश चव्हाण

अमळनेर :येथील बसस्थानकावर एका महिलेची ६५ हजार किमतीच्या २ तोळे वजनाच्या बांगड्या ३ रोजी दुपारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तामसवाडी ता.जि.धुळे येथील मयुरी चेतन पाटील या त्यांच्या सासू वंदना पाटील यांच्यासोबत २ रोजी गडखांब ता. अमळनेर येथे माहेरी आलेल्या होत्या.३ रोजी २ वाजेच्या सुमारास ते त्या दोघी अमळनेर जायला निघाल्या.दुपारी ३.३० बाजेच्या सुमारास अमळनेर येथे पोहोचल्यावर पुढे ते मांडळ येथून तामसवाडी गेले.

घरी गेल्यावर त्यांना सासूच्या हातातील २ तोळे वजनाच्या सोनाच्या बांगड्या दिसून आल्या नाहीत.अमळनेर बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत कुणीतरी अज्ञाताने महिलेच्या बांगड्या लांबवल्या असाव्यात. महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास हेकॉ प्रमोद पाटील करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध