Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ एप्रिल, २०२५
Home
/
Unlabelled
/
मुंबईच्या पथकाने शिरपूर जाऊन लावली आग, मुंबई डीआरआय पथकाने वनजमिनीवर केली कारवाई
मुंबईच्या पथकाने शिरपूर जाऊन लावली आग, मुंबई डीआरआय पथकाने वनजमिनीवर केली कारवाई
शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील आंबे-रोहिणी परिसरात बुधवारी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या मुंबईच्या पथकाने पुणे आणि नागपूर प्रादेशिक युनिट्सच्या सहकार्याने सांगवी पोलिस ठाणे हद्दीतील ९.४९ एकरावरील बेकायदेशीर गांजाची शेती नष्ट केली. या कारवाईदरम्यान सांगवी पोलिस अनभिज्ञ ठेवण्यात आले होते. नष्ट करण्यात आलेला गांजा कोट्यवधी रुपयांचा होता.
पथकाने बुधवारी सकाळी गांजाच्या शेतीवर मोठी कारवाई केली.सात ठिकाणी करण्यात येत असलेली शेती उद्ध्वस्त करण्यासाठी न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोजमाप घेण्यात आले आणि भूअभिलेखांसह जिओ-टॅग केलेल्या छायाचित्रांची नोंद करण्यात आली.एनडीपीएस कायद्याच्या कलम ४८ अंतर्गत संपूर्ण गांजाची शेती जप्त करून नष्ट करण्यात आली.या कारवाईत एकूण ९६ हजार ४९ गांजाची बेकायदेशीर
झाडे नष्ट करण्यात आली, तसेच ४२० किलो वाळवलेला गांजा, गोण्यांमध्ये भरलेला आढळला. तो जप्त करून नष्ट करण्यात आला.
स्थानिक पोलिस अनभिज्ञ
शिरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बाहेरील पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
जळगाव प्रतिनिधी :- पाचोऱ्यात ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या घटनेची दखल...
-
राज्याचे बजेट सादर झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीचे चित्र अत्यंत स्पष्ट झाले आहे. जमा आणि खर्चाचा ताळमेळ साधणे आता कठीण होणार असल्याचे लक्षात य...
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील पांडू बापू माळी मुनिसिपल हायस्कूल शिरपूर या ठिकाणी १९९७/९८ या शैक्षणिक वर्षाच्या दहावीच्या बॅचने दि. २३ मार्...
-
शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील आंबे-रोहिणी परिसरात बुधवारी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या मुंबईच्या पथकाने पुणे आणि नागपूर प्राद...
-
शिरपुर (प्रतिनिधी) उदयपूर (राजस्थान) येथील महाराणा प्रतापसिंह यांचे ७६ वे वंशज मेवाड़, उदयपूर राजघराण्याचे श्री जी हुजूर अरविंदसिंहजी मेवाड ...
-
प्रतिनिधी बहाळ येथील सर्वाधिक लोकसंख्खेच्या गाव असलेल्या गावात ग्रामसेवक २६ जानेवारीला घेण्यात येणारी ग्रामसभा दोन महिने उलटूनही अद्याप पर्य...
-
मुंबई, दि. २८:- राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां...
-
थाळनेर (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावातील दारूबंदीसाठी महिलांनी घोषणा देत ग्रामपंचायत वर व पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा नेत तक्रारी...
-
मालपुर प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे आवळ्याचे शेता जवळ हायवे रोडावर खड्डे पडले असुन हा रस्ता दोंडाईचा कडून साक्री कडे जाणाऱ्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा