Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ५ एप्रिल, २०२५

बहाळ ग्रामपंचायतीची अपात्र घरकुल यादी सोशलमिडीयावर व्हायरल ,अपात्र केलेल्या ग्रामस्थानाचा संताप...!



बहाळ ग्रामपंचायतीची अपात्र घरकुल यादी सोशलमिडीयावर व्हायरल ,अपात्र केलेल्या ग्रामस्थानाचा संताप
प्रतिनिधी बहाळ तालुक्यातील बहाळ येथील सतरा सद्श्य असेल्या मोठ्या ग्रामपंचायतीत गणल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीत अंधाधुंद कारभार सध्या सुरु आहे.त्याचाच प्रत्यय
२७/१२/२०२४ रोजी केलेल्या मासिक सभेत दिसून आला यात असंख्खे पात्र घरकुल लाभार्थी यांना अपात्र करण्यात आल्याचे ठरावाच्या यादीत दाखविले आहेत ज्यांचे कच्चेघर आहेत त्यांना देखील पक्के घरे दाखून अंधाधुंद कारभार करण्यात आला आहे २६ डिसेंबर रोजी सरपंच व कारकून यांच्यावर लाचलुचपत विभागात कार्येवाही करण्यात आली होती मात्र ग्रामपंचायतीने २७ डिसेंबर रोजी मासिक मिटिंग ठरवली होती तिच मिटिंग दिनांक २७ रोजी उपसरपंच किरण प्रमोद पाटील अध्यक्षखाली मासिक सभा घेण्यात आली होती त्यात ड यादीतील २५१ लाभार्थी विविध कारणे दाखऊन रिजेक्ट करण्याचा ठराव ग्रामसेवक पंकज चव्हाण यांनी केला आहे या ठरावाला सूचक म्हणून प्रकाश देवराम ठाकूर व अनुमोदक म्हणून सुवर्णा विजय महाजन यांनी केले आहे .सदर ठराव कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला आहे असा सवाल गावात चर्चीला जात आहे.

सदर ठरावाची कागदे सोशलमिडीयावर व्हायरल झाल्याने जे घरकुलसाठी पात्र लाभार्थी आहेत ते सूचक अनुमोदक यांना जाब विचारत आहेत तसेच अनेक सद्श्य उपस्थित नसताना देखील त्यांच्या नावाने ठराव पारित करण्यासाठी घेण्यात आले आहेत व अशा अंदाधुंद कारभार करणाऱ्यावर कार्येवाहीची मागणी अपात्र केले ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे .
१] मासिक मिटिंगच्या प्रोसिडींगवर व आयत्यावेळीच्या येणाऱ्या विषयात देखील घरकुल अपात्र करण्याबाबत विषय झाला नाही. तर मग हा घरकुल लाभार्थी अपात्र ठराव कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला आहे. आधिकाऱ्यांनी चौकशी करून तो ठराव रद्द करावा. लाभार्थी असलेल्याना घरकुलचा लाभ द्यावा, ग्रामपंचायत सद्श्या केशरबाई महाजन, बहाळ

२] ठरावातील लाभार्थ्यांची कमेटी पाठवून व्हेरिफाय करण्यात येईल जे पात्र आहेत त्याना घरकुलचा लाभ देण्यात येईल तसेच आता नवीन सर्वेक्षण सुरु झाले आहे अगोदर अपात्र केलेल्याना पात्र असतील तर त्याची प्राधान्याने नावे घेण्यात येईल. गटविकास अधिकारी अन्सार शेख, चाळीसगाव

३] २७ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या मासिक मिटींगला मी गैरहजर होतो . त्यादिवशी जळगाव येथे उत्तरकार्याच्या कार्येक्रमाला जळगाव येथे गेलो होतो त्यांनी परस्पर माझे नाव सूचक म्हणून टाकले आहे. ग्रामपंचायत सद्श्य प्रकाश ठाकूर ,बहाळ


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध