Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ एप्रिल, २०२५

बेटावद खान्देशचा ध्वज सप्तशृंगी गडावर रवाना


प्रतिनीधी:- गणेश चव्हाण

अमळनेर : शिंदखेडा तालुक्यातील

बेटावद येथून प्रतिवर्षाप्रमाणे शनिवारी सायंकाळी ७ वाजता सप्तशृंगी गडावर लावण्यासाठी रेणुका देवी मंदिरातून ध्वज निघाला. दि. ६च्या पहाटे ध्वजासह दिंडीचे सप्तशृंगी गडावर पोहोचणार आहे. या दिंडीत पंचक्रोशातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.




बेटावद येथे रेणुका देवीचे मंदिर असून तेथील पुजारी भानुदास बुवा यांचे पुत्र योगेश बुवा दरवर्षी सप्तशृंगी गडाकडे दिंडी मिरवणुकीने ध्वज घेऊन निघतात. चैत्र नवरातत्रोत्सवात खान्देशातून लाखो भाविक सप्तशृंगी गडावर पद‌यात्रेने रवाना होतात व देवीचे दर्शन घेतात. खान्देश हे सप्तश्रृंगीचे माहेर असून दख्खन सासर असल्याचे मानले जाते.



सप्तशृंगी गडावर बेटावद येथे माहेर मानल्या जाणाऱ्या रेणुका देवी मंदिराची सुमारे २०० ते २५० वर्ष जुनी वारीची परंपरा आहे. दरवर्षी बेटावद येथून चैत्रशुद्ध अष्टमीला वारीत प्रस्थान होते
तसेच या ध्वजचे ब्राम्हणे,कळंबू मुडी,बोदर्ड ,मांडळ या गावात मोठ्या प्रमाणात डि जे ब्ँड लाहुन वाजत गाजत स्वगत करून पाचपाऊली करून भाविक भक्त दर्शन घेतात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध