Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

घरकुलांचा पहिला हप्ता घेऊन बांधकाम न करणाऱ्यांचे घरकुल रद्द करा





मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन


अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांनी अनुदानाचे हप्ते मिळूनही त्यांची घरकुले अपूर्णावस्थेत आहेत तर काही लाभार्थ्यांनी शासकीय अनुदानाचे हप्ते घेऊनही बांधकामाला सुरवात केली नसल्याने त्यांचे घरकुल प्रस्ताव रद्द करण्यात यावेत तसेच खरोखर जे गरजू लाभार्थी या आहेत किंवा ज्यांनी घरकुलाचे बांधकाम शासकीय अनुदानाच्या सहाय्याने पूर्ण केले आहे अशा लाभार्थ्यांना अनुदानात वाढ करण्याची मागणी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गटविकास अधिकारी यांना करण्यात आली.



तालुक्यात पंचायत समितीमार्फत ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजना,रमाई आवास योजना,शबरी आवास योजना तसेच मोदी आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरकुल अनुदान वाटप करण्यात येते.प्रधानमंत्री आवास योजनेत तालुक्यात नव्याने ८ हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.त्यात मात्र फक्त २ हजार घरकुलांचे बांधकाम सुरू झाले आहेत तर ६ हजार घरकुले अद्यापही सुरू झालेली नाहीत.


निवेदन देताना तालुकाध्यक्ष बी. के.सूर्यवंशी, शहराध्यक्ष मनोज पाटील,डॉ.रवींद्र पाटील,शरद पितांबर पाटील , गजेंद्र साळुंखे , राजेंद्र नथु पाटील तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध