Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ एप्रिल, २०२५

सायबर साक्षरता व जनजागृती अभियान च्या स्तुत्य उपक्रम आयोजनाने डॉ.राहुल भाऊ चौधरी यांचा वाढदिवस साजरा.



संकल्प सेवा फाऊंडेशन धनवाडी चे 
संस्थापक अध्यक्ष डॉ. राहुल भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त सायबर साक्षरता व जनजागृती अभियान 365 दिवस कालावधी चा उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. 
        
सायबर गुन्हेगारी मुळे अनेक महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक याला वेगवेगळ्या प्रकारे बळी पडत आहेत. आर्थिक नुकसान, ऑनलाईन फसवणूक, के वाय सी फसवणूक, वीज बिल स्कॅम, इन्स्टंट लोन  फ्रॉड, ऑनलाइन जॉब्स फ्रॉड, लॉटरी फसवणूक, सोशल मिडिया फसवणूक,सेक्सोरशन व खंडणी स्कॅम, मॅट्रिमनी वेबसाईट स्कॅम, फायनान्शिअल व शेअर मार्केट फ्रॉड अशा अनेक प्रकारच्या सायबर गुन्ह्याला परिसरातील कोणताही नागरिक बळी पडून, आर्थिक व मानसिक नुकसान होवू नये या सामाजिक जबाबदारी च्या भावनेतून पुणे स्थित असणाऱ्या नामांकित सायबर सुरक्षा ट्रेनिंग & कन्सल्टन्सी च्या सहकार्याने व पोलीस मित्र, सायबर साक्षरता व जनजागृती समिती चे जिल्हा सरचिटणीस भूपेंद्र सुरेश वाघ यांच्या मुख्य संयोजन ने उपक्रम चे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियान साठी विशेष सहकार्य 
डॉ. राहुल रमण पाटील, डॉ. विवेक जैस्वाल, राष्ट्रीय अभियान प्रमुख श्री. सुनिल गोरे सर यांचे सहकार्य लाभले. 
      
       अभियान यशस्वीपणे 

राबविण्यासाठी सर्व नागरिकांना सायबर साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी संकल्प सेवा फाऊंडेशन चे सुनील कोळी(घोडगांव), प्रशांत कोळी(वाळकी), रोहन कोळी(शेंदणी), पवन धीवर(वाळकी), किरण भोई(घोडगांव), सागर पाटील(मोहिदे), विशाल बोरसे(हातेड), योगेश भोई
(कोळंबा), भावेश सोनवणे(लासूर), तेजस कोळी(वाळकी), समाधान ठाकरे(शेंदणी), ज्ञानेश्वर पाटील ( मोहिदेकर),लिलेश महाजन (अडावद),
विजय परदेशी(कोळंबा),अमोल सपकाळे(बुधगाव), निलेश पाटील
(वेळोदे),शुभम पाटील(लासूर), यश पाटील(भोकर), जयेश भोई (वेळोदे),व इतर सदस्य सहकारी प्रयत्नशील आहेत. 
         स्तुत्य अभियान मुळे 

परिसरातील शेकडो नागरिकांनी आनंद व्यक्त करून उपक्रमात सहभाग नोंदवून सायबर साक्षरतेच्या दृष्टीने आरंभ केला आहॆ.

सायबर सुरक्षा व जनजागृती उपक्रमात सहभागी होऊन सायबर साक्षर  बनण्यासाठी संपर्क साधा भूपेंद्र सुरेश वाघ सरचिटणीस - सायबर साक्षरता व जनजागृती समिती, जळगाव जिल्हा. 
 संपर्क: 9607021566

What's Group Link - https://chat.whatsapp.com/Jw5oZSALgxCFHxeH3g9ztz


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध