Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ एप्रिल, २०२५

प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या तीन शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई येथे सन्मानित करण्यात आले



प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम असोसिएशनतर्फे मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात आदर्श शिक्षक पुरस्कार पटकावला. उपशिक्षिका हेमांगी बोरसे, सुनीता पाटील आणि शाळेचे संगणक शिक्षक श्री.मनोज वाघ सर यांचा सोमवारी, 21 एप्रिल 2025 रोजी या प्रतिक्षित पुरस्काराने गौरव कराम्यात आला.धुळे जिल्ह्यातील एक नामांकित शिक्षण संस्था म्हणून प्रचिती इंटरनॅशनात स्कूलची ओळख आहे.या शाळेतील शिक्षकांना दरवर्षी राज्य समाचर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळत असतात,यासोबतच शाळेने उत्कृष्ट शाळा माण्णून अनेक पुरस्कार आणि गौरव प्रस केले आहेत.भातात्पर्यंत शाळेतील 15 शिक्षकांना शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते आदर्श शिक्षक
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे,तर शाळेला सलग 6 वेळा धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट साळा म्हणून गौरवण्यात आले आहे.याच गौरवशाली परंपरेला पुढे नेट,शैक्षणिक वर्ष 2024-25 साडी देखील शाळेला महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे.हौ बाब संपूर्ण साक्री तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे उल्लेखनीय कार्य आणि शिक्षकांचे उत्कृष्ट अध्यापन कार्य विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य इग्लिश मीडियम असोसिएशनने यावर्षी शाळेतील तीन शिक्षकांना आदर्श पुरस्काराने गौरवण्याचा निर्णय घेतला.मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मुंबई येथे झालेल्या
सत्कार समारंभात बोलताना पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी सांगितले की,प्रचिती इंटरनॅशनल स्कूल ही धुळे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट शाळा आहे आणि विद्याथ्यर्थ्यांना ज्ञानदान करत असतानाच त्यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामागे संस्थेचे अध्यक्ष प्रांत पाटील यांचे मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचान्यांच्या सहकायनि हा सत्कार समारंभमोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला.
राज्यस्तरीय अधिवेशनात या तिन्ही शिक्षकांना आदर्श शीक्षक पुरस्कार प्रधान करण्यात आले. शाळेच्या उपशिक्षिका हेमांगी बोरसे यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,साक्री तालुक्यातील मालपूर गावच्या रहिवासी असलेल्या बोरसे या त्यांच्या गावातील पहिल्या आदर्श शिक्षिका ठरल्या आहेत.त्यांच्या या यशाबद्दल शाळेतर्फे
आणि गावकऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. हेमांगी बोरसे यांचा शिक्षकी पेशा केवळ ज्ञानदानापुरता मर्यादित नसून,त्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरजू विद्याध्यर्थ्यांसाठी नेहमी तत्पर असतात.विशेष म्हणजे, त्या आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या वाढदिवली अनावस्यक खर्च टाळून शालेय शिक्षणासाठी उपयुक्त पुस्तके गरीब विद्याथ्यांना वाटप करतात.
लयांच्या या प्रेरणादायी कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. दुक्रा आदर्श शिक्षिका पुरस्कार सुनीता पाटील मॅडम यांना प्रदान करण्यात आला.
साक्री तालुक्यातील लोहगड गावच्या रहिवासी असलेल्या पाटील या त्यांच्या गावाची पहिली आदर्श शिक्षिका ठरल्या आहेत.त्यांच्या वा पुरस्कारामुळे लोहगड गावालाही मोठा अभिमान वाटत आहे.सुनीता पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले महत्वपूर्ण कार्य,गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेली स्वाधी तळमळ आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी या गुणांचे कौतुक करत मेस्टाने त्यांची या पुक्कारासाठी निवड केली.आमदार संजय केळकर आणि मेस्टाचे अध्यक्ष संजय तायडे.
यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांच्या या कार्यामुळे सिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक संदेश गेला आहे. शाळेतील तिसरे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते ठरले आहेत शाळेचे संगणक शिक्षक मनोज याथ साठी तालुक्यातील धम्मनार गावचे रहिवासी असलेले श्री. वाघ हे त्यांच्या गावातील पहिले आदर्श सिंक्षक ठरले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल गावकयांकडून आणि शाळेकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.मनीष वाघ केवळ एक शिक्षकब नव्हे,तर एक संवेदनशील नागरिक म्हणूनही समाजात सक्रिय आहेत.वाढदिवसासारख्या शुभ दिवशी अनावश्यक खर्च टाळून अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमाला भेट देतात,मुलांना जीवनावश्यक वस्तू आणि संगणकाचे मोफत प्रतिक्षण
देतात,तसेच वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदत करतात, यासोबतच,पर्यावरण संरक्षण करणे,गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यांसारख्या सामाजिक कार्यामध्येही ते सक्रिय सहभाग घेतात.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले.मुंबई येथे आदरों पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर या शिक्षकांसाठी शाळेत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील सर, प्राचार्य वैशाली लाडे शाळा समन्वयक वैभव सोनवणे,तुशार सर आणि सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचायांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध