Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ एप्रिल, २०२५

साक्री तालुक्यातील सामोडे येथील जलजीवन मिशनच्या कामातील अनागोंदी, काम का रखडले नागरिकांचा सवाल ?



 महाराष्ट्र राज्यात जल जीवन मिशन
योजनेसाठी २०२३-२४ पासून १६५७९- कोटी रुपये खर्च करण्यात आले.या अभियानात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. राज्याच्या ग्रामीण भागात २०२० पासून जल जीवन अभियान राबविण्यात आले. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणी द्वारे दरडोई किमान ५५ लिटर गुणवत्ता पूर्ण पाण्याचा पुरवठा दस्रोज करणे हे जलजीवन अभियानाचे मुख्य उद्दिष् आहे.
 त्यामुळे सामोडे ग्रामपंचायतसाठी मंजूर झालेल्या जलजीवन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे तर आहेच,शिवाय योजना जामखेली धरणावरून आणताना संबंधित गावे पेसा अंतर्गत येत असल्यामुळे त्यांचा ठराव न घेतल्यामुळे धरणातून पाणी घेण्यास त्यांचा विरोध आहे.मग अशा परिस्थितीत योजना होईल कशी ? पेसा अंतर्गत सामोडे ग्रामपंचायतही येते,ज्या घोडमाळ
परिसरासाठी ही योजना आहे, त्याच १७गावात ज्या समाजाचे लोक आहेत,त्याच समाजाचे लोक घोडमाळसह सामोडेत आहेत तरी ते आपल्या बांधवांना विरोध करतात.धरणात मोटर न टाकता धरणाखाली विहिर खोदून तेथून पाणीपुरवठा घेण्यास,योजना राचविण्यास आमची हरकत नाही असे ते सरपंच उपसरपंच म्हणत असतील तर मग कंत्रातदारांनी तशी धरणाखाली विहीर खोदून, जल जीवन योजना पूर्ण करावी. व लोकांना गंभीर पाणी समस्येपासून दिलासा द्यावा अशी मागणी सामोडे ग्रामपंचायत पासून तीन किलोमीटर अंतरावरील पाच ग्राम सदस्य निवडून येणाऱ्या दोन्ही वार्डातील जनता करीत आहे.सामोडे जल जीवन योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला असून,निकृष्ट दर्जाची कामे,खोटी कंत्राट देयके बनावट कागदपत्र,वशिल्याने कंत्रा मिळवणे,एकाच कंत्राटदाराला अनेक गावांची कामे देणं,त्यामुळे कामात होणारी दप्तर दिरंगाई,अकार्यक्षमता लक्षात घेता या
ठेकेदारांवरही योग्य ती कारवाई केली पाहिजे.अथवा त्यांच्याकडून ही योजना पूर्ण करून घेतली पाहिजे.योजनेशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे,अशी मागणी जनता करीत आहे.सामोडे येथील 
ग्रामपंचायत कडूनही घोडमाळ, यशोदानगर,कन्हैयालाल नगर जेवापुर रोड पोलीस स्टेशन हद्द,नवापूर रोड,सामोडे चौफुली साठी या दोन्हीकडून पाणीपुरवठा योजना असताना या पाच ग्रामपंचायत सदस्य निवडून जाणाऱ्या भागाला सात दिवसाआड पाणीपुरवठा होतो,पाण्याचे लिकेज काढले जात नाहीत.या पाणी समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत.पाणीपुरवठा नियोजनात कोणतीही सुसूत्रता नाही,निवडून आलेले काही ग्राम सदस्यानी मेन लाईन वर कनेक्शन जोडून आपल्याअन्यथा सामोडे ग्रामपंचायतला ज्या २२ एरियांना पाणीपुरवठा करावा लागतो तो भाग नगरपरिषद पिंपळनेरला जोडण्यात यावा,तसा ठराव सामोडे ग्रामपंचायत ने करावा अशी मागणी ही जोर धरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध