Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ एप्रिल, २०२५
Home
/
Unlabelled
/
पाचोऱ्यात ट्रक चालकाकडून ५० रुपये घेणे भोवले ; तीन वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई
पाचोऱ्यात ट्रक चालकाकडून ५० रुपये घेणे भोवले ; तीन वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई
जळगाव प्रतिनिधी :- पाचोऱ्यात ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी तातडीने चौकशी करून ट्रक चालकाकडून पैसे घेणाऱ्या पवन पाटील यांच्यासह तिघांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत असे की, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाचोरा तालुक्यात वाहतूक पोलीस पवन पाटील यांनी केळी वाहतूक करणारे मालमोटार अडवून चालकाकडे ५०० रुपयांची मागणी केली.परंतु, चालक ५० रुपये पेक्षा एक रुपया जास्त देण्यास तयार नव्हता. शेवटी पोलिसाने, आमची इतकीच इज्जत आहे का, असे म्हणत मिळालेले पैसे नाईलाजाने स्वीकारले असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.
ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा ट्राफिक पोलीसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील असल्याचं बोललं जात आहे. ट्रक चालकाकडून ५० रुपये घेताना ट्राफिक पोलीसाचा व्हिडीओ ट्रकच्या कॅबिनवर बसलेल्या एक व्यक्तीने मोबाईलमध्ये काढून तो व्हायरल केला.
पोलिसाला अद्दल घडविण्यासाठीपैसे घेतानाच व्हिडीओ ट्रकच्या कॅबिनवर बसलेल्या व्यक्तीने मोबाईलमध्ये बनवला. ट्रक चालक आणि पोलीस या दोघांमधील संभाषणाची चित्रफीत समाज माध्यमात टाकली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी या घटनेची दखल घेत तातडीने चौकशी करून पवन पाटील यांना निलंबित केले आहे. या घटनेच्या प्राथमिक तपासात पवन पाटील यांनी ट्रकचालकाकडून ५० रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हिडिओमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आली आहे. त्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
जळगाव प्रतिनिधी :- पाचोऱ्यात ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या घटनेची दखल...
-
राज्याचे बजेट सादर झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीचे चित्र अत्यंत स्पष्ट झाले आहे. जमा आणि खर्चाचा ताळमेळ साधणे आता कठीण होणार असल्याचे लक्षात य...
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील पांडू बापू माळी मुनिसिपल हायस्कूल शिरपूर या ठिकाणी १९९७/९८ या शैक्षणिक वर्षाच्या दहावीच्या बॅचने दि. २३ मार्...
-
शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील आंबे-रोहिणी परिसरात बुधवारी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या मुंबईच्या पथकाने पुणे आणि नागपूर प्राद...
-
शिरपुर (प्रतिनिधी) उदयपूर (राजस्थान) येथील महाराणा प्रतापसिंह यांचे ७६ वे वंशज मेवाड़, उदयपूर राजघराण्याचे श्री जी हुजूर अरविंदसिंहजी मेवाड ...
-
प्रतिनिधी बहाळ येथील सर्वाधिक लोकसंख्खेच्या गाव असलेल्या गावात ग्रामसेवक २६ जानेवारीला घेण्यात येणारी ग्रामसभा दोन महिने उलटूनही अद्याप पर्य...
-
मुंबई, दि. २८:- राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां...
-
थाळनेर (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावातील दारूबंदीसाठी महिलांनी घोषणा देत ग्रामपंचायत वर व पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा नेत तक्रारी...
-
मालपुर प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे आवळ्याचे शेता जवळ हायवे रोडावर खड्डे पडले असुन हा रस्ता दोंडाईचा कडून साक्री कडे जाणाऱ्...
-
शिरपूर प्रतिनिधी:- क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्थेची लाभार्थ्यांना लाभ देण्याची बिडिओ प्रदीप पवार यांना निवेदनाद्वारे मागणी पंचायत समित...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा