Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, २ एप्रिल, २०२५
Home
/
Unlabelled
/
तब्बल 27 वर्षानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले स्नेह मेळाव्याचे आयोजन.....
तब्बल 27 वर्षानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले स्नेह मेळाव्याचे आयोजन.....
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील पांडू बापू माळी मुनिसिपल हायस्कूल शिरपूर या ठिकाणी १९९७/९८ या शैक्षणिक वर्षाच्या दहावीच्या बॅचने दि. २३ मार्च २०२५ रोजी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले. सदर आयोजन करावे यासाठी व्हाट्सअप ग्रुप वर मित्रांची चर्चा होऊ लागली. आणि शिरपूर शहरात स्थायिक असलेले मित्रपरिवार यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले. प्रत्येक मित्र आपल्या दहावीच्या मित्रांना भेटण्यासाठी आतुर होता. म्हणून प्रत्येक मित्राने व्यस्ततेचे कारण न देता २३ मार्च रोजी कार्यक्रमासाठी प्रत्येक जण हजर राहिले. विशेष म्हणजे या बॅचमधील अनेक मित्र महाराष्ट्रात अनेक उच्च पदावर कार्यरत आहेत. तरीसुद्धा वेळात वेळ काढून स्नेह मेळाव्यासाठी प्रत्येक मित्र-मैत्रिणी हजर राहिले. सदर कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी शिरपूर मधील मित्र रोहित शेटे, विजय चौधरी, नरोत्तम धाकड, यांनी विशेष प्रयत्न केले. २३ मार्च रोजी स. नऊ वाजेला सर्व मित्र मैत्रिणी पांडू बापू मुनिसिपल हायस्कूल या ठिकाणी जमा झाले. सदर कार्यक्रमासाठी शैक्षणिक वर्ष १९९७/९८ या दहावीच्या वर्गाला शिकवणारे शिक्षक बंधू भगिनी यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी सर्व गुरुवर्य यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. उपस्थित गुरुवर्य यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले याच्या विशेष अभिमान गुरुवर्य यांना वाटला. तसेच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात भरपूर मोठे असे आशीर्वाद दिले. उपस्थित मित्र-मैत्रिणी यातील काही मित्रांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. मैत्रीचे नाते असेच टिकून राहावे याबद्दल सर्वांनी संपर्कात रहा अशी प्रेमपूर्वक आवाहन केले.
विद्यालयातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना काहीतरी भेटवस्तू द्यावी म्हणून विद्यालयाच्या मागणीनुसार पांडू बापू मुनिसिपल हायस्कूल यासाठी ३००० वह्या भेट देण्यात आल्या.
तदनंतर सर्व गुरुवर्य तसेच मित्र-मैत्रिणी शिरपूर येथील उत्सव हॉटेल या ठिकाणी स्नेहभोजनासाठी गेले. उत्सव हॉल येथे उपस्थित गुरुवर्य यांच्या सत्कार व सन्मान करण्यात आला. प्रत्येक मित्र-मैत्रिणी यांनी आपला परिचय दिला. सदर बॅचमधील विद्यार्थी मित्र मैत्रिणी की जे सध्या देशसेवा,
आरोग्य विभाग, उद्योजक, लेखक या क्षेत्रात कार्यरत आहेत अशा मित्र-मैत्रिणी यांच्या गुरुवर्य यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला. २७ वर्षानंतर एकत्र आलेला मित्रपरिवार आज महाराष्ट्रभर विविध ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवीत आहे याचा सर्व मित्र परिवार तसेच गुरुवर्य यांना आनंद झाला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी गुरुवर्य यांनी सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मित्रपरिवार यांनी गुरुवर्य यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी परमेश्वरास नमन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी मित्र परिवारातील अभिनेता, कलावंत जयवंत शिसोदे व लेखिका डॉ. हर्षदा पुराणिक यांनी केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनापासून पूर्णत्वासाठी प्रत्येक दिवस झटत असलेल्या विद्यार्थी मित्रांमध्ये सामाजिक कार्यकर्ते,भाजपा (शहरसरचिटणीस) रोहित शेटे,सर्जन डॉ.मयूर पाटील , फार्मासिस्ट, विजय चौधरी ,भाजीपाला मार्केट कमिटी अध्यक्ष संदीप देवरे ,न.पा कर्मचारी नरोत्तम धाकड ,उद्योजक रवींद्र माळी , सामाजिक कार्यकर्ते हेमराज राजपूत , नाशिक स्थित ब्युटी आर्टिस्ट नीलिमा राजपूत, पुणे येथील शिक्षकां मधुशा पाटील,रंजना वराडे यांनी प्रयत्न केले व कार्यक्रम संपन्न होण्यास हातभार लावला.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
जळगाव प्रतिनिधी :- पाचोऱ्यात ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या घटनेची दखल...
-
राज्याचे बजेट सादर झाल्यानंतर आर्थिक परिस्थितीचे चित्र अत्यंत स्पष्ट झाले आहे. जमा आणि खर्चाचा ताळमेळ साधणे आता कठीण होणार असल्याचे लक्षात य...
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील पांडू बापू माळी मुनिसिपल हायस्कूल शिरपूर या ठिकाणी १९९७/९८ या शैक्षणिक वर्षाच्या दहावीच्या बॅचने दि. २३ मार्...
-
शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील आंबे-रोहिणी परिसरात बुधवारी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या मुंबईच्या पथकाने पुणे आणि नागपूर प्राद...
-
शिरपुर (प्रतिनिधी) उदयपूर (राजस्थान) येथील महाराणा प्रतापसिंह यांचे ७६ वे वंशज मेवाड़, उदयपूर राजघराण्याचे श्री जी हुजूर अरविंदसिंहजी मेवाड ...
-
प्रतिनिधी बहाळ येथील सर्वाधिक लोकसंख्खेच्या गाव असलेल्या गावात ग्रामसेवक २६ जानेवारीला घेण्यात येणारी ग्रामसभा दोन महिने उलटूनही अद्याप पर्य...
-
मुंबई, दि. २८:- राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां...
-
थाळनेर (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावातील दारूबंदीसाठी महिलांनी घोषणा देत ग्रामपंचायत वर व पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा नेत तक्रारी...
-
मालपुर प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे आवळ्याचे शेता जवळ हायवे रोडावर खड्डे पडले असुन हा रस्ता दोंडाईचा कडून साक्री कडे जाणाऱ्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा