Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १५ एप्रिल, २०२५

शेणपूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.



शेणपूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सरपंच पती श्री.आकाश काकूंस्ते यांना देण्यात आले त्यांनी डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांचा प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.यावेळेस शेनपूर गावातील उप सरपंच पती श्री.नंदकुमार काकूंस्ते माझी सरपंच श्री कन्हैया काकूंस्ते यांचा हस्ते नारळ वाढवून बाबा साहेबांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले.श्री गणेश काकूंस्ते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले यावेळी दोन चिमुकल्या लेकीनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित संघर्षाचे वर्णन अतिशय प्रभावी पणे आपल्या भाषणातून केले यावेळी कार्यक्रमांत दलित समाजाचे सर्व तरुण,जेष्ठ,महिला,बगिनी, उपस्थित होत्या यात विशेष सहाय्य संभाजी थोरात सर चि.शरद थोरात श्री जिभाऊ थोरात श्री साहेबराव थोरात दीपक थोरात विक्रम थोरात दिलीप थोरात भुऱ्या थोरात,दादाजी थोरात ज्ञानेश्वर थोरात अतुल थोरात,महेंद्र थोरात राकेश थोरात बापू थोरात दगडू नंदन संतोष पगारे दिनेश साळवे ज्ञानेश्वर अहिरे या सह गावातील नागरिक उपस्थित होते.

तरुण गर्जना न्युज चॅनल साठी चंद्रशेखर अहिरराव धुळे जिल्हा प्रतिनिधी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध