Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० एप्रिल, २०२५

नंदुरबार शहर पोलीसांनी केली 08 गोवंश जनावरांची सुटका..! पशु संरक्षण व छळ प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल..



नंदुरबार प्रतिनिधी :-दि.08/04/2025 रोजी त्रिकोणी बिल्डींग कुरेशी मोहल्ला परिसरात गोवंश जनावरे अवैधरित्या कत्तल करण्याचे उद्देशाने व त्यांची बेकायदेशीर वाहतूक करणेसाठी डांबून ठेवण्यात आलेले आहेत, बाबत गोपनिय माहिती मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्री.श्रवण दत्त.एस,अपर पोलीस अधीक्षक श्री.आशित कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार विभाग श्री.संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अमितकुमार मनेळ व पोलीस ठाणे स्टाफ अशांनी शहरातील त्रिकोणी बिल्डींग कुरेशी मोहल्ला भागातील आरोपी नामे शेख इरफान शेख सलीम पटेल (कुरेशी) रा.कुरेशी मोहल्ला, नंदुरबार याचे ताब्यातील पत्र्याचे शेडमध्ये एकूण 08 गोवंश जनावरे हे अवैधरित्या कत्तल करण्याचे उद्देशाने व त्यांची बेकायदेशीर वाहतुक करणेसाठी निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत मिळून आले.

त्याअन्वये सदर आरोपीविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 239/2025 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5. 5(ए), 5(बी), 9 व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाईत 55 हजार रुपये किमतीची एकुण 08 गोवंश जनावरे बांधलेल्या अवस्थेत मिळून आल्याने सर्व जनावरांची सुटका करुन त्यांची तातडीने चारापाण्याची व्यवस्था करुन त्यांना गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.श्रवण दत्त.एस,अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे,नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध