Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २२ मार्च, २०२५

चिंतनभाई पटेल क्रीडा महोत्सव-२०२५ चा शानदार समारोप, "फक्त शिरपूर" क्रिकेट संघ विजेता



शिरपूर प्रतिनिधी : चिंतनभाई पटेल क्रीडा महोत्सव-२०२५ चा शानदार समारोप झाला. "फक्त शिरपूर" क्रिकेट संघ विजेता ठरला असून अजनाड न्यू फ्रेंड सर्कल क्रिकेट संघ उपविजेता तर पळासनेर येथील मनोजभाऊ युवा मंच या संघाने तृतीय स्थान पटकावले.


शिरपूर टेक्सटाईल पार्क चेअरमन, डिसान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर, भारतीय जनता पार्टी शिरपूर शहराध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सलग तिसऱ्या वर्षी भव्य स्वरूपात चिंतनभाई क्रीडा महोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन चिंतनभाई पटेल युवा प्रतिष्ठान शिरपूर यांच्या वतीने करण्यात आले होते.

माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम दादा पावरा, माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली चिंतनभाई पटेल क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन १८ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य स्वरूपात  झाले. १८ मार्च रोजी अतिशय थाटामाटात स्पर्धेचा समारोप झाला. शिरपूर तालुक्यातील सुमारे १६० क्रिकेट संघांनी सहभाग घेतला आहे.
 
या स्पर्धेचा अंतिम सामना व पारितोषिक वितरण सोहळा १८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता भगवंत पार्क, स्वामीनारायण मंदिराजवळ, वरझडी रोड, शिरपूर येथे संपन्न झाला. यावेळी सुरुवातीला उद्योगपती स्व. तपनभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल, उद्योगपती अंकितभाई पारीख मुंबई यांच्यासह शिरपूर उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, डीवायएसपी सुनिल गोसावी, तहसीलदार महेंद्र माळी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, धुळे जि. प. माजी अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी जि.प.उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के.डी.पाटील, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष श्यामकांत ईशी, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, माजी जि. प. सभापती  कैलास पावरा, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, माजी नगरसेवक हेमंत पाटील, प्रितेश पटेल, माजी नगराध्यक्ष सौ. संगिता देवरे, माजी नगरसेविका सौ. हेमलता गवळी, पोलीस निरीक्षक किशोर परदेशी, सांगवी एपीआय जयपाल हिरे, थाळनेर एपीआय शत्रुघ्न पाटील, माजी पीआय अन्साराम आगरकर, पिपल्स बँक संचालक संजय चौधरी, विजय पारधी, चंद्रकांत पाटील, छगन गुजर, पप्पू माळी, पिंटू शिरसाठ, गणेश सावळे, रज्जाक कुरेशी, पिंटू माळी, भटूआप्पा माळी, नारायणसिंग चौधरी, विक्की ढिवरे, बाबु खैरनार, पूजा जैन, 
योगेश बोरसे, रितेश, राजेश सोनवणे, शिरपूर तालुक्यातील अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप कार्यक्रम संपन्न झाला.

क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनासाठी उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जनकभाई पटेल, पंकीलभाई पटेल, योगेश भंडारी, अतुल भंडारी, नितीन अग्रवाल, निरज अग्रवाल, कुणाल राठी, अनुप  दायमा, प्रशांत अग्रवाल, विजय भंडारी, विनय भंडारी, कमलेश अग्रवाल, निरज भंडारी तसेच मुख्य नियोजक म्हणून बापू ठाकरे (वैष्णवी डीजे), संदीप माळी, मंजित पवार, सहकारी दुर्गेश गुजर, राजवर्धन पवार, विकी भोई, निलेश पाटील, रितेश राजपूत, हरिष गुजर, भूपेंद्र गुजर, ऋग्वेद पाटील, समर्थ चौधरी, सुनिल जैन, संदिप कुवर, राज देशमुख, चिंतनभाई पटेल युवा प्रतिष्ठान शिरपूरच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

सूत्रसंचालन प्रविण शर्मा यांनी केले. पंच म्हणून प्रा.राहुल स्वर्गे, संदिप देशमुख, चेतन राजपूत, भावेश शर्मा, वरुण पाटील, मयुरेश पवार, यश वाघ, हर्षल गोसावी, प्रफुल्ल ठाकूर तसेच समालोचक म्हणून राजेंद्र भैया पाटील, डॉ. निकम सर यांनी जबाबदारी सांभाळली.

यावेळी "फक्त शिरपूर" संघाला प्रथम बक्षीस रोख १ लाख रुपये तसेच ट्रॉफी व प्रमाणपत्र, अजनाड न्यू फ्रेंड सर्कल या संघाला द्वितीय बक्षीस रोख ७१ हजार रुपये तसेच ट्रॉफी व प्रमाणपत्र, पळासनेर येथील मनोजभाऊ युवा मंच या संघाला तृतीय बक्षीस रोख ५१ हजार रुपये तसेच ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध