Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ मार्च, २०२५

थाळनेरला पीक संरक्षण सोसायटी निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनलने सर्व १३ जागा जिंकल्या




थाळनेर(प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील पीक संरक्षण सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनलने १३ पैकी १३ जागा जिंकत शेतकरी विकास पॅनलचा धुवा उडवला.
तालुक्यातील थाळनेर पीक संरक्षण सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. माघारी नंतर महिला राखीवच्या २ जागा बिनविरोध झाल्या होत्या. माघारी नंतर शेतकरी परिवर्तन पॅनलच्या सुरेखाबाई तुकाराम मराठे व ताराबाई भालेराव पाटील हे बिनविरोध झाले होते.माघारी नंतर ११ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते.या निवडणुकीत डॉ.भगवान तलवारे,थाळनेर ते माजी लोकनियुक्त सरपंच प्रशांत निकम,विकास सोसायटीचे चेअरमन रमेश तलवारे व पीक संरक्षण सोसायटीचे माजी चेअरमन एकनाथ जमादार यांचे शेतकरी परिवर्तन पॅनल त्याविरुद्ध शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल व लोकनियुक्त महिला सरपंच मेघा संदीप पाटील,पीक संरक्षण सोसायटीचे चेअरमन किशोर पाटील यांचे शेतकरी विकास पॅनल यांच्या पॅनल मध्ये सरळ लढत होती.या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनल ११ जागांसाठी ११ उमेदवार तर शेतकरी विकास पॅनलने ११ जागांसाठी ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनलचे सर्वसाधारण गटातून एकनाथ काशिनाथ जमादार,रमेश भीलेसिंग जमादार,राजाराम गोधा तेले,किशोर धर्मा पाटील,विक्रम लोटन पाटील,नंदलाल माधवराव मराठे,अरुण एकनाथ शिंदे,शेखर विनायक शिंदे, अनुसूचित जाती/जमाती गटातून अण्णा दौलत बोरसे, भटक्या निमित्त जाती/जमाती गटातून चंद्रकांत चिंधा तेले, इतर मागासवर्गीय गटातून हेमंत सुखरू चौधरी यांनी बाजी मारली.या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने पत्रकार हेमंत चौधरी निवडून आले.या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते.या निवडणुकीत त आजी माजी चेअरमनाची प्रतिष्ठा पणाला लागली होती.या निवडणुकीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून बघितले जात होते.निवडणूक शांततेत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी डी पाटील यांनी काम बघितले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध