Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ मार्च, २०२५

सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था राखण्यास सर्वांचे सहकार्य आवश्यक उपविभागीय पोलिस अधिकारी गोसावी यांचे आवाहन



शिरपूर (प्रतिनिधी) प्रसार माध्यम व सोशल मीडियाच्या चुकीच्या पद्धतीने वापर करून समाजकंटक जाती धर्मात तेढ निर्माण करून आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवतात. आक्षेपार्ह संदेश नकळत समाज माध्यमांवर प्रसारित करुन आपणही त्याला हातभार लावतो. त्यामुळे गंभीर परिणाम उद्भवू शकतात. पोलिसांसोबत प्रत्येक समाज घटकाने समाज माध्यमांवरील संदेशावर नजर ठेवली व वेळीच योग्य पाऊल उचलले  तर धार्मिक, जातीय तेढ निर्माण करु पाहणाऱ्यांचे वेळीच बंदोबस्त करता येईल असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांनी व्यक्त केले.

शिरपूर येथील पोलिस ठाण्यातर्फे रमजान ईद, गुढीपाडवा व रामनवमीच्या पार्श्वभूमी वर आयोजित शांतता समितीच्या सभेत ते बोलत होते.

नवनियुक्त पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी,यांनीही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून सांप्रदायिक सौहार्द कायम राखून सर्व धर्मीयांनी आपले सण उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.आपले शहर व तालुक्यात शांतता राखण्याची काळजी घेणे ही सर्वांची सामूहिक जबाब दारी आहे. चुकीचे कृत्य करू नये व कायदा हातात घेऊन ये म्हणून कायद्याची योग्य माहिती देण्यासाठी युवकांचे प्रबोधन आव श्यक आहे असेही ते म्हणाले.  सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्थांचे  पदाधिकारी उपस्थित होते. 

मुस्लिम समा जाचे नेते रज्जाक कुरेशी, यांनी रमजान ईदच्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल विवेचन केले व सांप्रदायिक एकता कायम  कायम राखण्या चे आश्वासन दिले. शिवसेना (उबाठा) चे राजू टेलर यांनी शिरपूर हे सांप्रदायिक सलोख्याचे प्रतीक असल्याचे सांगितले. पत्रकारांतर्फे राजेश मारवाडी यांनी पोलीस व पत्रकार एकमेकां चे पूरक असून शिरपूरचे पत्रकार कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी पोलि सांना सर्वतोपरी सहकार्य करतील असे मत व्यक्त केले.शिवसेना (उबाठा) चे जिल्हा उपप्रमुख भरतसिंह राजपूत यांच्यासह विजयसिंह राजपूत, राजेश सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले.सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आभार मानले.शिरपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. गोपनीय विभागाचे चंदन सोनार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध