Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ मार्च, २०२५

पत्रकार सेवा संघाची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न...!



शिरपूर/प्रतिनिधी पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याची बैठक शिरपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली असून यावेळी पत्रकार संघाची मुख्य कार्यकारणीसह राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. 
         
कार्यक्रमाच्या सुरवातीला संघाचे जेष्ठ संचालक चंद्रवदन गुजराथी व विजय शुक्ला यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती दिली. तर यावेळी नवीन मुख्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यात संस्थेच्या अध्यक्षपदी युवराज राजपूत यांची तर सचिव पदी योगेश पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.  त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी चंद्रवदन गुजराथी, कार्यकारणी संचालक पदी रवीप्रकाश भावसार,भरत रोकडे, विजय शुक्ला, दिलीप पाटील, संतोष भोई, विजय चव्हाण, जयपाल चौधरी,  दीपक श्रीराव यांची मुख्य कार्यकारिणीपदी निवड करण्यात आली तर राज्य कार्याध्यक्षपदी विजय शुक्ला व प्रदेशअध्यक्षपदी विजय चव्हाण यांची निवड करण्यात आली.  कार्यक्रमास संस्थेचे ध्येयधोरण व पुढील काम कायद्याविषयी चर्चा करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध