Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० मार्च, २०२५
सोशल मीडिया वापराबाबत लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियम : देवेंद्र फडणवीस
मुंबई :- राज्यातील शासकीय कर्मचारी,अधिकारी यांना सोशल मीडिया वापरासंबंधात कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.गृहविभाग (सायबर सेल),माहिती व तंत्रज्ञान विभाग,तसेच विधि व न्याय विभाग यांच्या समन्वयाने यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. समाजमाध्यमांसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे तयार करून पुढील तीन महिन्यांत शासन निर्णय जारी करण्यात येईल,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बुधवारी दिली.आम.डॉ.परिणय फुके यांनी शासकीय कर्मचाऱ्यांकडून समाज माध्यमांच्या वाढत्या वापरावर बंधने नसल्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे नियम तयार करताना सोशल मीडिया अस्तित्वात नसल्याने त्यात समाजमाध्यमे वापरासंदर्भात कोणताही उल्लेख नव्हता.मात्र,बदलत्या काळानुसार आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा नियमात बदल करण्यात येणार आहेत,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.संवाद,लोकहितासाठी वापर व्हावा राजकीय स्वरूपाचे भाष्य करणे, शासकीय धोरणांवर उघडपणे टीका करण्यास नागरी सेवा नियमानुसार प्रतिबंध आहे.जम्मू-कश्मीर, गुजरात यांसारखी राज्ये तसेच लालबहादूर शास्त्री अकादमी यांनी यासंदर्भात तयार केलेल्या नियमांनुसार महाराष्ट्रही आपल्या सेवाशर्तींमध्ये सुधारणा करणार आहे.
यासंदर्भात संबंधितांच्या काही सूचना असल्यास पुढील एक महिन्यात त्या सामान्य प्रशासन विभागाकडे (सेवा) द्याव्यात.शासकीय कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांचा उपयोग जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी करावा,असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा प्रतिनिधी : सज्जनांचे रक्षण करण्याऐवजी चोरांना चोरी करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा सरदार बनलेल्या पीएसआय प्रल्हाद पिरोजी मांटे याच्य...
-
सोनगीर ते दोंडाईचा व दोंडाईचा ते चिमठाणे रस्ता वाहतुक 16 एप्रिलपासून पुढील आदेश होईपर्यंत राहणार बंदधुळे प्रतिनिधी :- दिनांक 17 एप्रिल, 2025 धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सोनगीर दोंडाईचा टाकरखेडा रस्ता प्ररामा - 1 (भाग किमी 18/880 त...
-
शेणपूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सरपंच पती श्री.आकाश काकू...
-
शिरपूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार काशीराम दादा पावरा,मा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,मा. जि.प.अध्यक्ष डॉ तुषार रंधे, उद्योगपती चिंतनभाई पटेल, ,...
-
पिंपळनेर येथील शिव मल्ल हनुमान मंदिरात साला बादा प्रमाणे शिवमल्ल हनुमान मंदिर पिंपळनेर ग्रामस्थ यांनी या वर्षी ही मोठ्या उत्सहात मल्ल हनुमा...
-
प्रतिनीधी:-गणेश चव्हाण अमळनेरऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीतील मानधन अद्याप न मिळाल्याने अमळनेर येथील ग्रामरोजगार सहाय्यकांनी का...
-
महाराष्ट्र राज्य साखर उद्योगासाठी कार्यरत शुगर टास्क फोर्सच्या राज्य कोअर कमिटीच्या संचालकपदी महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे मार्गदर्शक...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर मलांजन येथील पांझरा नदीवर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत साटवन बंधारा भूमी पूजन कार्यक्रम आज रोजी दि.11/04/20...
-
महाराष्ट्र राज्यात जल जीवन मिशन योजनेसाठी २०२३-२४ पासून १६५७९- कोटी रुपये खर्च करण्यात आले.या अभियानात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. र...
-
मालपुर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे:- शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे आज सकाळी ९ वाजता क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्तान...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा