Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, २६ मार्च, २०२५
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील अन्नपूर्णा फायनान्स प्रा.लि.च्या नावाखाली फसवणूक फसवणुकीचा बळी ठरलेल्या १९ जणांनी पोलिसांकडे केली तक्रार
शिरपूर तालुक्यातील अन्नपूर्णा फायनान्स प्रा.लि.च्या नावाखाली फसवणूक फसवणुकीचा बळी ठरलेल्या १९ जणांनी पोलिसांकडे केली तक्रार
• अन्नपूर्णा फायनान्स प्रा. लि. च्या नावाखाली फसवणूक.
प्रत्येकी ७५ हजार व ४० हजार रुपये काढले.
• पोलिसांकडे कायदेशीर कारवाईची मागणी.
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील तांडे व परिसरातील इतर गावात १९ पेक्षा जास्त नागरीकांची अन्नपूर्णा फायनान्स प्रा.लि.च्या नावाखाली फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रारदारांनी शिरपूर शहर व थाळनेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाम नंदू बोरसे व आकाश नंदू बोरसे (रा.दहिवद ता.शिरपूर) यांनी त्यांना अन्नपूर्णा फायनान्स प्रा.लि.च्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडून कागदपत्रे घेतली असून शाम नंदू बोरसे व आकाश नंदू बोरसे यांनीतक्रारदारांना प्रत्येकी ७५ हजार आणि ४० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. व तक्रारदार यांना विश्वासात घेऊन शाम नंदू बोरसे व आकाश नंदू बोरसे यांनी अॅक्सिस बँकेत त्यांची खाती उघडली आणि त्यांना
एटीएम कार्ड दिले. मात्र एटीएम कार्ड द्वारे संबंधीतांनी तक्रारदारांच्या खात्यातून प्रत्येकी ७५ हजार आणि ४० हजार रुपये काढून घेतले. जेव्हा पीडितांना खात्यातून पैसे काढल्याचे समजले, तेव्हा त्यांनी शाम नंदू बोरसे व
आकाश नंदू बोरसे यांच्याकडे विचारणा केली. मात्र संबंधीतांनी त्यांना समाधानकारक उत्तर दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी परिसरातून व तक्रारदारांकडून होत आहे.
(सविस्तर वाचा पुढील अंकात)
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पिंपळनेर येथील शिव मल्ल हनुमान मंदिरात साला बादा प्रमाणे शिवमल्ल हनुमान मंदिर पिंपळनेर ग्रामस्थ यांनी या वर्षी ही मोठ्या उत्सहात मल्ल हनुमा...
-
प्रतिनीधी:-गणेश चव्हाण अमळनेरऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीतील मानधन अद्याप न मिळाल्याने अमळनेर येथील ग्रामरोजगार सहाय्यकांनी का...
-
राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची सह्याद्र...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर मलांजन येथील पांझरा नदीवर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत साटवन बंधारा भूमी पूजन कार्यक्रम आज रोजी दि.11/04/20...
-
प्रतिनीधी:- गणेश चव्हाण अमळनेर : मोबाईल मध्ये सट्टा जुगार खेळवून पैसे स्वीकारताना पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडून मोबाईल मधील सात नावे शोधून त...
-
मालपुर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे:- शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे आज सकाळी ९ वाजता क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्तान...
-
प्रतिनीधी:- गणेश चव्हाण अमळनेर : तालुक्यातील मारवड येथे डांगरी रस्त्याला असलेल्या खळवाडीस अचानक आग लागल्याची घटना ११ रोजी दुपारी तीन सा...
-
महाराष्ट्र राज्य साखर उद्योगासाठी कार्यरत शुगर टास्क फोर्सच्या राज्य कोअर कमिटीच्या संचालकपदी महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे मार्गदर्शक...
-
शेणपूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सरपंच पती श्री.आकाश काकू...
-
महाराष्ट्र राज्यात जल जीवन मिशन योजनेसाठी २०२३-२४ पासून १६५७९- कोटी रुपये खर्च करण्यात आले.या अभियानात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा