Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २७ मार्च, २०२५

महाराणा राणा सांगा यांच्या बद्दल अपशब्द बोलणाऱ्या खासदाराचा शिरपुरात क्षत्रिय समाजाकडून निषेध



शिरपूर प्रतिनिधी:- महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्याबद्दल संसदेत अपशब्द बोलणाऱ्या समाजवादी पार्टीचा उर्मट राज्यसभा खासदार रामजी लाल सुमन (आग्रा उत्तर प्रदेश) याच्यावर कठोर कारवाई करावी , त्यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करावे इत्यादी मागण्यांसाठी दिनांक 27 मार्च रोजी महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत संस्था आणि तालुक्यातील समाज बांधवांनी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक शिरपूर यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेश समाजवादी पार्टीचा राज्यसभा खासदार रामजी लाल सुमन (आग्रा) या उर्मट, बेताल खासदाराने शुक्रवार दि २१/०३/२०२५ रोजी राज्यसभेत महाराणा संग्रामसिंग (राणा सांगा) यांच्या
बद्दल अपशब्द बोलला. रामजी लाल सुमन याच्यावर कठोर कारवाई व्हावी, त्याची खासदारकी रद्द व्हावी. त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, त्याने तात्काळ माफी मागावी अशी मागणी आम्ही या निवेदना द्वारे करण्यात आली आहे. 


विदेशी आक्रमणा विरोधात लढणारे लढवैये महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा, जे आपला एक हात, एक डोळा, एक पाय गमावून देखील शत्रूसोबत लढले, ८० जखमा शरीरावर झेलून ज्यांनी देशासाठी लढा दिला त्यांचे बलिदान देश कसा विसरू शकतो?

उदयपुर राजस्थान चे राजे राणा सांगा यांच्या बद्दल बाबर आपल्या आत्मचरित्रात देखील लिहुन गेला आहे की "राणा सांगा आपल्या शौर्यामुळे आणि तलवारीच्या सामर्थ्यामुळे अमर झाले". बाबर विरोधात राणा सांगा अखेर पर्यत लढले परंतु काही बाबर ची पिलावळ महाराणा संग्रामसिंग यांच्या बद्दल संसदेत अपशब्द बोलता. हे कदापि सहन केले जाणार नाही. देशातील कोणत्याही राष्ट्रपुरुष आणि महापुरुषाबद्दल अवमानकारक वक्तव्य कधीही सहन केले जाणार नाही.

राज्यसभा खासदार रामजी लाल सुमन याच्या बेताल वक्तव्यामुळे समाजा समाजात तेढ निर्माण होऊन पूर्ण देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या व्होट बैंक साठी हिंदूंवा य सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या खासदारावर कठोर कारवाई व्हावी, त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा येत्या काळात राजपूत समाजाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने राजपूत समाज बांधव आणि महिला वर्ग उपस्थित होते.

काय आहे खरा इतिहास याची माहिती खानदेशातील सुप्रसिद्ध इतिहासकार जयपाल सिंह गिरासे यांनी यावेळेस दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध