Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ मार्च, २०२५

पिंपळनेर वनक्षेत्रातील राऊंड मधील उमरपाटा मळगाव नियतक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक १९४,१९५,१९६ च्या भागात मोठ्या प्रमाणावर सागवान वृक्षांची कत्तल



पिंपळनेर (प्रा) वनक्षेत्रातील पिंपळनेर राऊड मधील मळगाव व उमरपाटा नियत क्षेत्रातील क.पां.क्र.१९४,१९५,१९६ च्या जंगल क्षेत्रात साधारणता एक महिन्यापासून मौल्यवान सागवान वृक्षांची फार मोठ्या प्रमाणावर अवैद्य तोड होत आहे.व तोड केलेल्या सागवान झाडांचा विस्तार माल श्री संदीप प्रभाकर मंडलिक वनपाल पिंपळनेर यांचे उपस्थितीने व मध्यस्थीने विक्री करून पसार केला जात असल्याचे सुजान नागरिक,वृक्षप्रेमी सांगत आहेत. 
 सदर क्षेत्रातुन रात्रो बेरात्रो अवैध तोड केलेला साग वुक्षाचा माल ईमारती स्वरूपात तयार करुन तो साॅमिला मध्ये चिरखाम विक्री केला जातो.त्यातुन श्री संदीप प्रभाकर मंडलिक वनपाल पिंपळनेर हे लाखो रुपयाची कमाई करीत आहेत.सोबत GPS पुरावे जोडीत आहे.
श्री संदीप प्रभाकर मंडलिक वनपाल पिंपळनेर यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच अत्यंत संशयातीत व भ्रष्ट वादातीत आहे.त्यांच्या वनसंपदा तोड वाहतूक विक्री अवैद्य अतिक्रमण रोपनांचा नाश शासकीय मुख्यालयातील सततची अनुपस्थिती याबाबत नागरिकांनी असंख्य तक्रारी केलेले आहेत पिंपळनेर राऊंड मधील पंचक्रोशीतील सरपंच पोलीस पाटील वन संरक्षण समितीचे कार्यकर्ते जागरूक नागरिक यांनी श्री नितीन कुमार सिंग उपवनसंरक्षक धुळे वन विभाग धुळे यांना समक्ष भेटून श्री संदीप प्रभाकर मंडलिक वनपाल पिंपळनेर यांच्यावर पिंपळनेर वनक्षेत्रातील बोढरा येथील ३३ कोटी वृक्ष लागवड योजनांची तीन रोपनाचे अवैद्य तोड होऊन त्यात सामुदायिक रित्या अवैद्य अतिक्रमण झाल्याबाबत जबाबदार असल्याचे समक्ष सांगितलं होते.परंतु श्री नितीन कुमार सिंग उपवनसंरक्षक धुळे वन विभाग धुळे हेच श्री संदीप मंडलिक वनपाल पिंपळनेर अनेक वन अधिकाऱ्यांचे आका आहेत त्यांच्या आशीर्वादानेच सारे भ्रष्टाचारी कृत्य राजरोस पणे सुरू आहेत.
 श्री संदीप मंडलिक वनपाल पिंपळनेर यांनी यापूर्वी खाजगी व्यक्ती मार्फत फोन पे वरून खंडणी वसूल केली त्याबाबत संपूर्ण पुरावे अवैद्य तोड या याबाबत आज मीतीस आम्ही तब्बल २२ तक्रारी दाखल केलेले आहेत परंतु एवढा दोन वर्षे एवढा प्रदीर्घ कालावधी होऊन देखील त्यांच्यावर काही एक दंडत्मक कारवाही होत नाही याचा वारंवा प्रत्यय येत आहे 
 तरी यासोबत सागवान वृक्षांची सर्रासपणे कत्तल होत असल्याचे GPS फोटो लोकेशन पाठवीत आहोत यावरून खात्री करून पिंपळनेर राऊंड मधील मळगाव उमरपाटा नियत क्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक १९४,१९५,१९६ यात एका महिन्यापासून श्री संदीप प्रभाकर मंडलिक वनपाल पिंपळनेर यांच्या संमतीने श्री नितीन कुमार सिंग उपवनसंरक्षण धुळे वन विभाग धुळे यांच्या आशीर्वादाने होत आहे.कर्तव्यात कसूर केल्याबद्दल म्हणून त्यांच्यावर दंडात्मक  कायदेशीर कार्यवाही  करण्यात यावी जेणेकरून भविष्यात कुणीही मौल्यवान सागवान वृक्षांची कत्तल करून व विक्री वाहतूक करण्याची हिम्मत करणार नाही. व विभागीय वन अधिकारी दक्षता विभाग तसेच वनक्षेत्रपाल संरक्षण व गस्तीपथक अतिक्रमण धुळे वन विभाग धुळे हे देखील सतत दुर्लक्ष करून भ्रष्टाचारांना मुकसंमती देत असल्याचे आमचे निदर्शनास आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध