Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २२ मार्च, २०२५

थाळनेर पीक संरक्षण सोसायटी निवडणुकीत आजी-माजी चेअरमन च्या पॅनलमध्ये मध्ये सरळ लढत



थाळनेर (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील पीक संरक्षण सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ जागांपैकी २ जागा बिन विरोध झाल्यामुळे ११ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत.
याबाबत थोडक्यात वृत्त असे की, शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील पिक संरक्षण सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.या निवडणुकीत 13 जागा होत्या.त्यापैकी दोन मला राखीव च्या महिला बिनविरोध झाल्यामुळे माघारी नंतर ११ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.या निवडणुकीत ११ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत विकास सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे व पिक संरक्षण सोसायटीचे माजी चेअरमन एकनाथ जमादार यांचे शेतकरी परिवर्तन पॅनल व शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल,लोकनियुक्त महिला सरपंच मेघा संदीप पाटील,पीक सोसायटीचे चेअरमन किशोर पाटील यांचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत होत आहे.या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनलने ११ जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असून शेतकरी विकास पॅनलचे ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.पीक संरक्षण सोसायटीचि प्रथमच निवडणूक होत आहे.या निवडणुकीत सर्वच लढती चुरशीच्या होणार आहेत. या निवडणुकीत आजी माजी चेअरमन ची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

निवडणूक ही जिल्हा परिषद व पंचायत समिती रंगीत तालीम ठरणार आहे. या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.सदर निवडणूक २३/३/२५ रविवार रोजी सकाळी ८ ते  ४ या वेळेत विकास सोसायटी गोडाऊन मध्ये पार पडणार आहे.मतमोजणी व निकाल लगेच घोषित करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.डी.पाटील हे काम बघत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध