Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० मार्च, २०२५

मांडळ येथे बँक ऑफ बडोदा शाखेचा, भोंगळ कारभार


तरूण गर्जना रिपोट

 अमळनेर  तालुक्यातील मांडळ हे गाव सर्वात मोठे असून, मांडळ बडोदा बँक शाखेला, मांडळ सह , वावडे,तळवडे, मुडी,कळंबू,  लोन, बामणे, जवळपास आठ ते नऊ खेड्यांचे आर्थिक व्यवहार, होत असतात.


 परंतु ह्या शाखेला कर्मचारींचा फार मोठा तुटवडा आहे, एवढ्या मोठ्या शाखेला तीन ते चारच कर्मचारी, शाखेतील व्यवहार हा करोड रुपयातील आहे, उलाढाल फार मोठी आहे, जवळपासच्या खेड्यावरील शंभर ते दोनशे ग्राहक व्यवहार करण्यासाठी येत असतात, तसेच गावातील ही ग्राहक फार मोठ्या प्रमाणात आहे, परंतु स्टॉप हा कमी असल्याकारणाने, अनेक ग्राहकांना तासनतास रांगेत ताटकळत  उभे राहावे लागते, एवढे करूनही सदर शाखेतील कर्मचारी, कॅश शिल्लक  नाही, कॅश ची गाडी आली नाही, वरून आम्हाला कॅश मिळत नाही, अनेक ग्राहकांना खाली हाताने परत जावे लागते, ग्राहकांचे स्वतःचे ठेवलेले खात्यामध्ये पैसे वेळेवर मिळत नसल्याने, फार मोठी नाराजी परिसरातील ग्राहकांची झालेली आहे, अनेक ग्राहकांकडे कोणाकडे लग्न, साखरपुडा,दवाखाना ह्या कामासाठी अर्जंट पैसे पाहिजे असतात पण ते वेळेवर मिळत नाही, सदर शाखेतील मॅनेजर व कर्मचारी सांगतात की आमचा स्टाफ अपूर्ण आहे, आम्ही काय करू शकतो, लाडक्या बहिणीच्या पैसे काढण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी शाखेत होत आहे, शाखेतील कर्मचारी दररोज अर्धा तास  जेवणाची सुट्टी एकत्रित घेत असतात, वरील फोटोमध्ये दिनांक 19  3  2025 रोजी दुपारी शाखेतील सर्व कर्मचारी जेवणाला गेल्यामुळे शाखेतील कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या आहेत, त्यामुळे ग्राहकांना जागेवरच बसावं लागतं,


 अनेक वेळा तक्रार करून सुद्धा या शाखेतील स्टॉप वाढवण्यात येत नाही, बँकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, या गंभीर गोष्टीकडे लक्ष देऊन कर्मचारी बँकेत वाढवावे व पैशांची काढण्याची व ठेवण्याची  सुविधा वेळेवर करण्यात यावी, व बँकेने  चांगली सुविधा द्यावी.सर्व परिसरातील खेड्यांवरील व गावातील ग्राहक ही मागणी करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध