Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, २ मार्च, २०२५
Home
/
Unlabelled
/
थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरीत्या गोमांस विक्री करणाऱ्या तिघांना साहित्यासह केली अटक
थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरीत्या गोमांस विक्री करणाऱ्या तिघांना साहित्यासह केली अटक
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावात आज दिनांक 2 मार्च रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास येथील स्थानिक गौरक्षकांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की गावातील काही इसम हे गायीची हत्या करून गोमास विक्री करत आहेत. यानंतर गावातील व परिसरातील गोरक्षक यांनी एकत्र येत या सर्व प्रकार उघडकीस आणला. यावेळेस परिसरात तात्पुरती स्वरूपात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेवरून गोरक्षकांच्या भावना संतप्त झाल्या होत्या. या सर्व गोरक्षकांनी मुद्देमालासह आरोपी यांना ताब्यात घेत थाळनेर पोलीस स्टेशन गाठत रीतसर कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संपूर्ण प्रकाराबाबत भगवान चैतन्य महाराज वय 45 वर्ष कृष्ण गोशाळा पिंपळे तांडा यांनी समक्ष पोलीस स्टेशनला हजर राहून याबाबतची अधिकृत तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी नमूद केले आहे की थाळनेर गावातील गोरक्षक अजय विठ्ठल कोळी यांनी फोनवरून गावात मनियार मोहल्ला येथे गोहत्या झाली असून तिचे मास विकले जात असल्याची माहिती दिली. यानंतर मी प्रदीप नागोसिंग राजपूत राहणार नांथे तालुका शिरपूर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना घेऊन थाळनेर गावात आलो. गावातील गोरक्षक कार्यकर्ते १) अजय बापू बहारे २) मायेशद्र मोरे ३) अविनाश मगन कोळी ४) सतिष सखाराम भिल ५) पराग शेखर शिंदे व इतर ३० ते ४० इसम असे आम्ही सकाळी १०.०० वाजताचे सुमारास मनियार मोहल्ला येथे खात्री करणेसाठी मुनाफ कुरेशी याचे राहते घरात पाहणी केली असता सदर ठिकाणी १) सलमान मुनाफ कुरेशी हा गोमास कापताना २) इसान मुनाफ करेशी हा गोमास विक्री करतांना व ३) ईरफान मुनाफ कुरेशी हा सदर गोमास पिशवीत भरतांना दिसुन आला. त्यानंतर आम्ही त्यांना गोहत्या बंद करणे बाबत सांगन त्यांचे कडून गोमास तसेच गोमास कापण्यासाठी व विक्री करण्यासाठी वापरण्यात येणारे हत्यार, साधन असे तसेच गोमास कत्तल विक्री करणारे वरील तिन्ही इसम यांना सोबत घेऊन थाळनेर पोलीस स्टेशनला घेऊन आलो.आम्ही सोबत आणलेल्या गोमास व इतर साहित्यांची पोलीसांनी दोन पंचासमक्ष पाहणी केली. यावेळी 9,100 रुपयांचे गोमास व कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य असा मुद्देमाल आढळून आला. वरील वर्णनाचे व किंमतीचे गोमांस व गोमांस कापण्यासाठी, वापरण्यात येणारे हत्यार, साधन सामुग्री असे मिळुन आल्याने मिळालेल्या मांसाची तपास सदर मांस हे गोवंशीय प्राण्याचे आहे अगर कसे? याबाबत खात्री करणेसाठी थाळनेर पशु वैदयकीय अधिकारी, थाळनेर यांना फोन करुन बोलविले असता ते थाळनेर पोलीस आले. पोलीसांनी त्यांना पत्र दिल्याने पशु वैदयकीय अधिकारी यांना प्रथम दर्शनी गोमांस असल्याचा संशय आल्याने त्यांनी सदर मांसामधुन दोन प्लॉटीकच्या बरणीत गोमांसचे नमुने घेत जनावनाचे कत्तल केलेले मांस व इतर साधन सामुग्री पुढील कारवाई करीता पोलिसांनी जप्त केली असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
आज दिनांक ०२/०३/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेचे सुमारास थाळनेर गावात मनियार मोहल्ला मध्ये मुनाफ कुरेशी याचे राहते घरात १) सलमान मुनाफ कुरेशी, वय २६ वर्ष, इम्रान मुनाफ कुरेशी, वय २८ वर्षे व ३) ईरफान मुनाफ कुरेशी, वय ४७ वर्षे सर्व राहणार कु मोहल्ला थाळनेर ता. शिरपुर जि. धुळे हे महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावराची कत्तल करण मनाई असतांनाही ते गोवंशीय जनावराची कत्तल करुन विक्री करतांना मिळुन आले म्हणून वरील इसमांन विरुध्द कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आले आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावात आज दिनांक 2 मार्च रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास येथील स्थानिक गौरक्षकांना गोपनीय माहिती...
-
शिरपुर प्रतिनिधी- शिरपूर तालुका म्हटले म्हणजे सर्वप्रथम सर्वसामान्याच्या डोळ्यासमोर येते ते, शिरपुर नगरचे भाग्यविधाते व विकासपुरुष मा, आमदार...
-
रणाईचे येथे भक्तनिवास सह विविध विकास कामांचे भूमिपूजन अमळनेर-तालुक्यातील रणाईचे येथील श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिरातील महंत बाबांचा मला न...
-
तरूण गर्जना रिपोट अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यासह मध्यप्रदेश व इतर राज्यात बॅग लिफ्टिंग सह ,बँकेतून काढलेले पैसे लंपास...
-
तरूण गर्जना रिपोट अमळनेर:- तालुक्यातील मुंगसे येथील २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना २५ रोजी सायंकाळी...
-
मोफत वीज, वाढीव अनुदान आणि वेगवान गृहनिर्माण... प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी! केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शा...
-
तरूण गर्जन रिपोट अमळनेर प्रतिनिधी :- तालुक्यातील मुंगसे येथील २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना २५ रोज...
-
शिंदखेडा प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथे खोटी माहिती व कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत चारशे बोगस मतदाराची नावे समाविष्ट करण्या...
-
शिंदखेडा तालुक्यातील आरोपीला नाशिक येथून घेतले ताब्यात अमळनेर : सात महिन्यांपूर्वी निसर्डी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला गर्भवती करण...
-
जळगाव प्रतिनिधी :- शहरातील शाहूनगर भागात एमडी ड्रग्जचा साठा करून विक्री करणाऱ्या एका संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५ लाख ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा