Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ मार्च, २०२५

श्रीक्षेत्र करवंद येथे गुरुमाऊली अण्णा साहेब मोरे यांच्या उपस्थितीत 26 रोजी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व राष्ट्रीय महासत्संग देवेंद्र पाटील व आयोजकांतर्फे उपस्थितीचे आवाहन



शिरपूर ( प्रतिनिधी) तालुक्यातील श्रीक्षेत्र करवंद येथे येथे १२ ज्योतिर्लिंग प्राणप्रतिष्ठा, पंचकुंडी महायज्ञ व राष्ट्रीय महासत्संग सोहळा 23 मार्च पासून सुरू झाला आहे. 23 मार्च रोजी संध्याकाळी मूर्तींची गावातून स्वाध्याय मिरवणूक करण्यात आली यात आकर्षक सजीव देखाव्यांच्या समावेश होता.

सोमवारी 24 मार्च रोजी कलशपूजन, मातृका स्थापना, आयुष्य मंत्र, नंदी श्राद्ध आदी कार्यक्रम संपन्न झाले. आज 25 मार्च रोजी मंगळवारी धान्याधिवास, स्थापित देवता पूजन भक्ती भावपूर्ण वातावरणात संपन्न होत आहेत. उद्या दिनांक 26 मार्च बुधवारी गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थि तीत १२ ज्योतिर्लिंगांची व देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा भव्य धार्मिक सोहळ्यात होणार आहे. संध्याकाळी चार वाजता राष्ट्रीय महा सत्संग होईल. त्यात गुरुमाऊली अण्णा साहेब श्री. मोरे सेवेकऱ्यांशी हितगूज करतील. तसेच वागताना मार्गदर्शन करतील. या भव्य अशा महासत्संग सोहळ्याला व मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. जयकुमार भाऊ रावळ, आ.अमरिशभाई पटेल, आ. काशीरामदादा पावरा डॉ. विजयकुमार गावित, आ.अनुपकुमार अग्रवाल, आ. राम भैय्या भदाणे, माजी नगराध्यक्ष भूपेश भाई पटेल जिल्हाधि कारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, जि.प. सीईओ विशाल नरवाडे , प्रांता धिकारी शरद मंडलिक,  माजी जि. प. अध्यक्ष डॉ. तुषार भाऊ रंधे, भाजप जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, शहर भाजपा ध्यक्ष चिंतन भाई पटेल, युवा नेते हेमंतभाऊ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.  अशी माहिती देवेंद्र( देवा दादा) पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्राचे मुख्य मार्गदर्शक तथा गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांचे पुत्र चंद्रकांत मोरे यांनी करवंद येथे भेट देऊन नियोजनाचा आढावा घेतला. श्री. मोरे यांच्या हस्ते पंचकुंडी महायज्ञाच्या स्थळाचे भूमिपूजन झाले. शहर व तालुक्यातील स्वामी समर्थ सेवा केंद्रांचे पदाधिकारी, धार्मिक संघटनांचे प्रमुख व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री.मोरे म्हणाले की या धार्मिक सोहळ्यात सुमारे एक ते दीड लाख भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन करावे. उन्हाळ्याच्या पार्श्व भूमी वर विशेष काळजी घ्यावी. उत्तर महाराष्ट्र सत्संग सेवा समिती, सर्व केंद्र सेवेकरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवेंद्र पाटील ( देवा दादा) यांनी कार्यक्रमाचा नियोजन आराखडा सादर केला. परिसरातील व्यवस्थेबद्दल श्री. मोरे यांनी समाधान व्यक्त केले.त्यापूर्वी दुपारी एकपासून भैरवचंडी पाठसेवा होईल. देवेंद्र पाटील व सहकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.भाविकांना मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन देवेंद्र पाटील व आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध