Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ मार्च, २०२५

शिरपुर लोकन्यायालयात तडजोडीतून 1 कोटी 39 लाखांची वसुली पॅनलच्या मध्यस्तीने वैवाहिक दाम्पत्याने पुन्हा थाटला संसार



शिंदखेडा -  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे यांच्या आदेशानुसार  दिनांक 22/03/2025 रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे शिरपुर  न्यायालयात आयोजन करण्यात आले होते. यात तळजोडीतून 1कोटी 39 लाख 39 हजार 64 रुपयांची वसुली करण्यात आली. पैनलच्या मध्यस्थीने वैवाहिक दाम्पत्याची समजूत काढून प्रकरण तडजोड करण्यात येवुन वैवाहिक संसार पुन्हा थाटला. वैवाहिक दाम्पत्यास संपूर्ण पॅनल मार्फत शुभेच्छा देण्यात आल्या.
    
यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश आर. आर. भद्रे यांनी न्यायालयांमधुन जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यायालयात निकाली काढण्याच्या दृष्टीने संबंधित प्रकरणातील वकिल वर्ग, पक्षकार, नगरपालिका, पंचायत समिती संबंधित अधिकारी, बॅंक, फायनान्स कंपनी अधिकारी यांना प्रकरणे तडजोडीसाठी ठेवून तडजोडीसाठी प्रयत्न करण्यासाठी आवाहन केले होते.
   
पॅनल सदस्य म्हणुन अॅड. श्रीमती शालिनी सोनवणे  यांनी काम पाहिले. यात दाखलपुर्व बॅंक प्रकरणे, फायनान्स कंपनीचे प्रकरणे, महावितरण कंपनी, एन.आय.अॅक्ट खालील प्रकरणे तसेच ग्रामपंचायतींची एकुण 2919 प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली. तसेच तीनही न्यायालयातील एकुण 54 प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली असुन त्यात फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, एन.आय.अॅक्ट प्रकरणे, वैवाहीक प्रकरणे व दिवाणी प्रकरणात तडजोड करण्यात येवुन निकाली काढण्यात आली.

सदर लोकअदालतीमध्ये तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष वाय. व्ही. ठोंबरे,सचिव एन.ए.चव्हाण, विधीज्ञ यांनी सहभाग नोंदविला. बॅंक अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, नगरपालिका कर्मचारी, पोलिस कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांनी लोकन्यायालय यशस्वी होणेसाठी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध