Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

विशाल वरील हल्ला करनारे सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल



पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात


अमळनेर : एमपीडीएतून सुटून आलेल्या विशाल दशरथ चौधरी याच्यावर ३ रोजी बाजार समिती आवारात केलेल्या हल्ल्याबाबत विशाल च्या जबाबावरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे._


विशाल दशरथ चौधरी रा भोईवाडा अमळनेर याने दवाखान्यातून जबाब दिला की, ३ रोजी सकाळी साडे दहा ते ११ वाजेच्या सुमारास बाजार समिती आवारात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात उभा असताना विजय सुरेश शिंगाणे , प्रीतम हिरालाल शिंगाणे , दीपक हिरालाल शिंगाणे ,दीपक शांताराम ढोके , गणेश बापू शिंगाणे , दिनेश गायब शिंगणे सर्व रा भोई वाडा हे आले व कुरापत काढून याला आज सोडायचे नाही म्हणून दमबाजी सुरू केली. गणेश शिंगाणे याच्या हातातील धारदार शस्र विजय याने घेऊन विशाल च्या डोक्यावर मारन गंभीर जखमी केले.विशाल खाली पडताच दीपक याने हातातील चाकूने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केली. त्याचवेळी दीपक याच्या हातातील। लोखंडी रॉड दीपक ढोके व दिंननेशह यांनी हातातील लाठ्या काठ्यानी विशालच्या पायावर मारहाण केली. त्याचवेळी नागरिकांनी पोलीस गाडी मागवली. त्याला उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले होते. तेथून जबाब दिल्यावरून सहा जणांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता १०९ , १८९(२) , १९१(२),१९१(३),१९० ,११५ ,३५१(२),३५२,१३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत. दरम्यान पोलीसानी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध