Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

रेल्वेमध्ये चोऱ्या करणाऱ्या नायडू गॅंगला अटक करण्यात अमळनेरच्या रेल्वे पोलिसांना यश




अमळनेर रेल्वे पोलिसांनी नायडू गँग ला पकडले

रेल्वे आणि मोठ्या शहरात करायचे चोऱ्या

अमळनेर : रेल्वेमध्ये चोऱ्या करणाऱ्या नायडू गॅंगला अटक करण्यात अमळनेरच्या रेल्वे पोलिसांना यश आले असून आरोपीना पकडून त्यांच्याकडून चोरीतील २ लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता मध्य रेल्वे च्या खंडवा ,भुसावळ आणि जळगाव आरपीएफ कडून मोबाईलवर अमळनेर एएसआय कुलभूषणसिंग चौहान याना माहिती मिळाली की खंडवा स्टेशनवर प्रवाश्यांचा सामान चोरी झाल्याची घटना घडली असून त्यात एक गँग सामील आहे आणि ते एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर कपडे बदलवून रूप बदलतात असे सीसीटीव्ही फुटेज देखील प्राप्त झाले. खंडवा स्टेशनवर एफआयआर दाखल झाली आहे. नंतर हे सराईत गुन्हेगार भुसावळ उधना गाडी क्रमांक १९१०६ मध्ये रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सत्यजित कुमार याना प्राप्त झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने कुलभूषणसिंग यांनी अमळनेर चे कर्मचारी हेडकॉन्स्टेबल नंदू पाटील , अर्जुनसिंग याना अमळनेर स्टेशनवर मेमो गाडी आली असता गुन्हेगारांचा शोध घेण्यास सांगितले. तीन चार डबे तपासल्यावर सामान्य कोच मध्ये चार संशयित व्यक्ती आढळून आले. त्यांना पोलिसांनी घेराव घालून त्यांची उलट तपासणी सुरू केली. तिकीट आहे का यावरून त्यांना स्टेशनवर चौकशीला उतरवले. पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच त्यांनी त्यांची नावे अविनाश महारनन्ना नायडू वय २५ , अजय महारनन्ना नायडू वय २५ , काली कुन्नईया नायडू वय २९ तिघे रा वाकीपाडा मरीमाता मंदिर जवळ नवापूर महाराष्ट्र आणि राजा आरमबम वय ३३ रा अमरनगर एम आर ४ रोड उज्जैन मध्यप्रदेश असे सांगून त्यांनी नायडू गँग चे सदस्य असल्याचे सांगितले. या नायडू गँग मध्ये सात ते आठ सदस्य असून त्यांनी रेल्वे मध्ये तसेच विविध शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्याच्याजवळून जप्त केलेल्या साहित्यात दोन लॅपटॉप , ६ मोबाईल , चार्जर , घड्याळ ,४६ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ८१ हजार रुपयांचे साहित्य तसेच दोन धारदार चाकू असे जप्त करण्यात येऊन आरोपीना वरिष्ठ निरीक्षकांकडे सोपवण्यात आले आहे. नायडू गँग चे सदस्य सापडल्याने मोठ्या चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध