Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

अमळनेर मध्ये ९ लाखाच्या चोरीसह विविध ठिकाणी चोऱ्या करणारी टोळी सापडली



तरूण गर्जना रिपोट

अमळनेर प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यासह मध्यप्रदेश व इतर राज्यात बॅग लिफ्टिंग सह ,बँकेतून काढलेले पैसे लंपास करणारी तसेच अमळनेर येथून ९ लाख रुपये लांबवणारी आंध्रप्रदेशातील टोळीला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.

१० फेब्रुवारी रोजी बापू शिंगाणे यांनी प्लॉट घेण्यासाठी आयडीबीआय बँकेतून ९ लाख रुपये काढले. पैशांची पिशवी त्यांनी मोटरसायकल ला लावली. आणि आपल्या पत्नीसह घराजवळ पोहचताच मागाहून येत दोन

मोटरसायकलस्वारांनी मोटरसायकलवरील पिशवी लांबवली. आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी आपल्या पथकाला तपासणी साठी पाठवले असता आरोपीनी बुलढाणा जिल्ह्यात खामगाव येथे देखील चोरी केल्याचे समजले. परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ

,हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , निलेश मोरे , विनोद संदानशीव , उज्वल म्हस्के याना आरोपींचा मागोवा घेण्यास सांगितले. आरोपींचे फुटेज पथकाने सर्वत्र पाठवले असता मध्यप्रदेशात कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत यासदृश्य आरोपी ७० हजार चोरी करताना सापडल्याचे समजले. नूतन डीवायएसपी विनायक कोते यांच्या आदेशाने पथक मध्यप्रदेशात रवाना झाले.

मध्यप्रदेशातील हरदा जिल्ह्यातील कारागृहात गोड्डे टू सलमान रामुलू वय ५३ , छल्ला प्रभुदास रमेश वय ३१ रा कप्परल्लथिप्पा , पेटला शरेसकुमार संपथकुमार वय ३२ , डी भावेश मोहनधुरू वय २० सर्व रा कपरल्ला ठिप्पा बोगोलू मंडलंम गल्ली मुदुगुनेलोर ,ब्रिन्टगुंठा आंध्रप्रदेश हे आरोपी अटकेत होते. यातील दोघांनी अमळनेर येथे ९ लाखांची चोरी केल्याचे स्पष्ट झाले. अमळनेर पोलिसांनी या चौघांचा ताबा घेतला. त्यांची प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी बुलढाणा ,अमळनेर ,खरगोन मध्यप्रदेश , नंदुरबार आदी ठिकाणी भरदिवसा चोऱ्या केल्याचे कबुल केले.

चारही आरोपीना अमळनेर पोलीस स्टेशनला अटक केली असून त्यांच्याकडून अनेक ठिकाणच्या चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध