Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

भाजप आमदाराने टी ई टी नापास शिक्षकांची यादी मागवली!!!





अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याची शक्यता 

सन 2011 नंतर बॅक डेट बोगस शिक्षक भरतीची चौकशी लावण्याची मागणी 

भाजपा आमदारांनी राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुदतीच्या आत टी ई टी परीक्षा पास न केलेल्या शिक्षकांची यादी इतर माहितीसह एका रकाण्यात भरून मागवली असल्यामुळे त्या शिक्षकांचे व संस्था चालकांचे धाबे दणा णले आहे.
कारण जळगाव जिल्ह्यात देखील बऱ्याच माध्यमिक शाळेत बोगस बॅक डेट शिक्षक भरती करण्यात आली आहे. यात जास्तीत जास्त संस्था चालकांचे नातेवाईक मंडळी यांचा भरणा करण्यात आलेला दिसून येतो. घरचीच संस्था असल्यामुळे आणि जळगाव जिल्हा शिक्षण विभागात काही भ्रष्ट मंडळी त्यांना मदत करत असल्यामुळे त्यानी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण नसतांना आणि बनावट कलर झेरॉक्स करून आणलेल्या सर्टिफिकेटच्या जोरावर शिक्षकाची नोकरी मिळवत अप्रूव्हल मंजूर करून घेत पगार सुरु करून टाकले आहेत.
आता या सर्वच शिक्षकांची माहिती जळगाव जिल्हा शिक्षण विभागाला द्यावी लागणार असल्यामुळे बरीच मंडळी गोत्यात सापडणार आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात संबंधित आमदार याविषयी लक्षवेधी मांडतात का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

त्याचबरोबर सन 2011 पासून मोठ्या प्रमाणात बोगस बॅक डेट शिक्षक भरती केल्याचे दाखवून लाखो रुपये फरकबील वेतन अधीक्षक कार्यालय येथून काढून आणण्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यात सुरूच आहे. त्याची पण अधिवेशनात लक्षवेधी मांडून हा भ्रष्टाचार उघडकीस आणून संबंधित कर्मचारी व संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करून त्या शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध