Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

जळगाव शहर पोलिसांच्या छाप्यात एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त...!



जळगाव प्रतिनिधी :- शहरातील शाहूनगर भागात एमडी ड्रग्जचा साठा करून विक्री करणाऱ्या एका संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५ लाख ३४ हजार रुपये किमतीचा ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपी हा आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे समोर आले असून, त्याच्यावर यापूर्वीही आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
गस्तीदरम्यान पोलिसांना मिळाली गुप्त माहिती शनिवारी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी आनंद निकुंभ आणि प्रफुल्ल धांडे हे शाहूनगर परिसरात गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, शाहूनगरमधील एका घरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाईचे नियोजन करून छापा टाकण्याचा निर्णय घेतला.

संशयिताच्या घरी छापा; मोठा साठा हस्तगत

शहर पोलिसांनी शाहूनगरमधील सर्फराज जावेद भिस्ती (वय २३) याच्या घरी छापा टाकून झडती घेतली असता, पोलिसांना घरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळीच आरोपीला ताब्यात घेत त्याच्या घरातून ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केला. या अंमली पदार्थाची बाजारात किंमत सुमारे ५ लाख ३४ हजार रुपये इतकी आहे.

एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सर्फराज जावेद भिस्ती याच्यावर यापूर्वीही आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल असल्याने तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपीकडून आणखी काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध