Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२५

अल्पवयीन मुलीला पळवून तिला गर्भवती करणारा आरोपी अटकेत



शिंदखेडा तालुक्यातील आरोपीला नाशिक येथून घेतले ताब्यात


अमळनेर : सात महिन्यांपूर्वी निसर्डी येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला गर्भवती करणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील तरुणाला पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. त्याच्यावर पोस्को कायद्यानुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   
तालुक्यातील लोंढवे येथील इयत्ता दहावीला शिक्षण  घेणारी निसर्डी येथील अल्पवयीन मुलगी १२ जुलै २०२४  रोजी घरातून बेपत्ता झाली होती. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मुलीला शिंदखेडा तालुक्यातील मेलणे गावातील किसन शामा बोरसे याने पळवून नेले असून तो मुलीसोबत नाशिक येथे राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास देवरे याना मिळाली होती. त्यांनी दोघांच्या शोधासाठी हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे , निलेश मोरे आणि सागर साळुंखे याना नाशिक येथे रवाना केले. किसन त्या अल्पवयीन मुलीसोबत  नाशिक च्या नांदुरा नाका येथे राहत असल्याचे कळताच पोलिसांनी दोघांना तेथून ताब्यात घेतले व अमळनेर पोलीस स्टेशनला आणून वैद्यकीय तपासणी केली. मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी किसन याला अटक करून त्याच्यावर पोस्को कायद्यानुसार अत्याचाराचे वाढीव कलम लावले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध