Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या




अमळनेर: तालुक्यातील चौबारी येथील २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना १९ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चौबारी येथील विवाहिता जागृती निलेश पाटील (वय २५) हिने राहत्या घरी लोखंडी कडीला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. मयत जागृती हिचे २०२१ मध्ये चौबारी येथील निलेश कैलास पाटील याच्याशी लग्न झाले होते व त्यांना १.५ वर्षाची मुलगी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध