Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५

अवैध गौण खनिज करणारे ट्रॅक्टर पकडले




अमळनेर : तालुक्यातील बोहरा रस्त्यावर १६ रोजी महसूल पथकाने अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून मुद्देमालासह तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली अभिमान जाधव (ग्राम महसूल अधिकारी कन्हेरे) विक्रम कदम (ग्राम महसूल अधिकारी शहापूर) ,पवन शिंगारे (ग्राम महसूल अधिकारी सावखेडा) , दिपक पाटील (ग्राम महसूल अधिकारी डांगर बु) अमोल चक्रे (ग्राम महसूल अधिकारी जवखेडे) , आकाश गिरी (ग्राम महसूल अधिकारी पातोंडा) यांनी ही कारवाई केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध