Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५

शिरपुरात उद्यापासून खंडोबा महाराजांचा यात्रौत्सव



शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री खंडेराव महाराजांचा यात्रौत्सव उद्या दि.१२ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. महाआरतीचा कार्यक्रम व यात्रोत्सव उद्घाटन कार्यक्रम आ. काशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते होईल. 

यावेळी विविध मान्यवरांच्याहस्ते महाआरती होईल.भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री खंडेराव बाबा विकास संस्थेचे अध्यक्ष कैलास धाकड, उपाध्यक्ष संजय आसापुरे, कोषाध्यक्ष किरण दलाल, कार्याध्यक्ष साहेबराव महाजन, सचिव गोपाल मारवाडी, प्रमुख विश्वस्त गुलाब भोई, विश्वस्त गोपाल ठाकरे, शरद अग्रवाल, श्रीहरी यादगीरीवार, स्विकृत सदस्य भानुदास मोरे पुजारी, गोविंदराव मोरे पुजारी, नाना सोनवणे, गजानन मगरे, संजय बारी, जगदीश बारी, राजेंद्र धोबी, प्रकाश भोई, सुभाष भोई, अशोक राजपुत, संजय पाटील, पुजारी माधवराव मोरे, उत्तमराव मोरे, व्यवस्थापक महेश देवकर यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध