Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२५

शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत गांजा लागवडीचा केला पर्दाफाश, 51 लाखांहून अधिकचा मुद्देमाल केला जप्त..!



शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गम भागातील वनजमिनीवर गांजा या अंमली पदार्थयुक्त वनस्पतीची लागवड केली जाते. याविरोधात गोपनीय माहिती काढून अशा पिकांची लागवड करणाऱ्या व त्याला प्रोत्साहन देणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक सो. धुळे यांनी दिले होते.

दि. 14/02/2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, भियासिंग दिलदार पावरा रा. आसरापाणी ता. शिरपूर जि. धुळे हा आसरापाणी गावाच्या वनजमिनीत गांजा पिकातून गांजा काढत आहे. तसेच तो रात्रीतून उर्वरित झाडे कापून सर्व मुद्देमाल नष्ट करणार आहे.

या माहितीच्या आधारावर, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी मा. पोलीस अधीक्षक सो. धुळे यांची परवानगी घेऊन, रात्री घटनास्थळ संरक्षित करण्यासाठी जाप्ता नेमून, दि. 15/02/2025 रोजी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.काशिराम देवरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांसह कायदेशीर प्रक्रिया राबवून संयुक्त छापा कारवाई केली.

या कारवाईत भियासिंग दिलदार पावरा यांच्या शेतात 112.750 किलो सुका गांजा (किंमत 11,27,500/- रुपये) आणि 800 किलो गांजाची ओली झाडे (किंमत 40,00,000/- रुपये) मिळून आली.

सदर, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. काशिनाथ देवरे यांनी इतर कर्मचाऱ्यांसह आसपासच्या परिसरात पाहणी केली असता, आसरापाणीपासून 5 किलोमीटर अंतरावर हाडाखेड गावाच्या शिवारात दशरथ रिशा पावरा रा. हाडाखेड ता. शिरपूर जि. धुळे यांच्या वनजमिनीवर गांजाची लागवड (1200 किलो, किंमत 24,00,000/- रुपये) केलेली आढळली. पोलिसांचा छापा पडणार असल्याची माहिती मिळाल्याने दोन्ही ठिकाणांहून आरोपी पळून गेले आहेत. या कारवाईत एकूण 51,27,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई यांनी केली मा. पोलीस अधीक्षक धुळे श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर विभाग श्री. सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई-मनोज कचरे, व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तसेच उपवनसंरक्षक श्री. नितीनकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. काशिनाथ देवरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध