Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

बाभळे गावातील बोगस मतदारांची नावे वगळवा अन्यथा 3 मार्चला ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला आत्मदहनाचा इशारा



शिंदखेडा प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथे खोटी माहिती व कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत चारशे बोगस मतदाराची नावे समाविष्ट करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गावात सहयांची मोहीम राबवली ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे १३३ नागरीकांच्या सहयाचे पत्राचे निवेदन जिल्हाधिकारी यांचाकडे ज्ञानेश्वर पाटील यांनी सादर केले आहे. दिलेल्या निवेदनात दि 3 मार्च रोजी आत्मदहन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 
 
बाभळे व वाघाडी ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आली आहे.अशातच काहींनी मतदार यादीत बोगस नावे घुसडली असल्याचा दावा ज्ञानेश्वर पाटील यांनी केला असून त्यांनी बोगस मतदारांची यादीच सादर केली. बनावट आधार कार्ड व  रहिवासी दाखला तयार करून बोगस मतदार समाविष्ट करण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे. मतदार यादीतील भाग क्रमांक 257 मध्ये आॅक्टोबर 2023 मध्ये 902 मतदार होते. आॅगस्ट 2024 ला 995 व आॅक्टोबर 2024 मध्ये ही संख्या 1022 झाली. 31 जानेवारी 2025 ला बीएलओ यांनी एकूण मतदार 1425 असल्याचे सांगितले. गावातील एकूण संख्या 1078 इतकी आहे. त्याच्या  70 टक्के म्हणजे 754 एवढेच मतदार असावेत. मग एवढे मतदार कुठून आले याचा शोध घेणे गरजेचे आहे. 

ग्रामपंचायत निवडणूक जवळ आल्याने बोगस मतदार वाढ केली जात असावी अशी शंका आहे. त्यांचे रेशन कार्ड, घर क्रमांक किंवा घराचा नमुना क्रमांक 8 अ तपासावे आणि बोगस मतदारांची नावे यादीतून वगळण्यात यावीत यावीत यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सहयांची मोहीम राबविण्यात आली आहे. यात सुमारे १३३ ग्रामस्थांनी तक्रारीवर सहया केल्या आहेत. चौकशी करून बोगस मतदारांची नावे वगळण्यात यावीत अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तक्रारींची दखल घेतली गेली नाही तर दि ३ मार्च रोजी आत्मदहन करण्यात येईल असा इशारा श्री पाटील यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध