Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५

भविष्यासाठी विद्यार्थी नाही तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारी प्रचिती इंटरनॅशनल स्कूल ला महाराष्ट्राचे राज्यपालांच्या हस्ते *धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा 2025 चा पुरस्कार बहाल.



प्रचिती इंटरनॅशनल शाळा ही धुळे
जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एकमेव CBSE मान्यताप्राप्त शाळा आहे.या शाळेची स्थापना 2011 साली झाली आहे.
प्रचिती शाळा ही गुणवत्तापूर्ण शिक्षण,उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ओळखली जाते.या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नवभारत टाइम्स तर्फे प्रचिती शाळेला धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा 2025 हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी विविध निकषांवर शाळेचे मूल्यमापन करण्यात आले.त्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता,विद्यार्थ्यांची प्रगती,शिक्षकांचे योगदान, उपक्रमशीलता, सातत्याने उत्कृष्ट शिक्षण, नैतिक मूल्य, गुणवत्ता पूर्ण अध्यापन आणि सामाजिक कार्य आदींचा समावेश होता.
प्रचिती शाळा केवळ परीक्षांमध्येच चांगली कामगिरी करणारी संस्था नाही,तर सुसंस्कार, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारी जोपासणारी एक चळवळ आहे खेळ, कला,विज्ञान,सामाजिक उपक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्येही शाळेने उत्तुंग यश मिळवले आहे.
पुरस्कार वितरण समारंभ मुंबई येथे संपन्न झाला. राज्यपालांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रशांत पाटील,प्राचार्या सौ वैशाली लाडे,समन्वयक
श्री वैभव सोनवणे व एच.ओ.डी.कांचन अहिरराव यांनी पुरस्कार स्वीकारला.या पुरस्कारामागे खऱ्या अर्थाने विद्यार्थी व शिक्षकांप्रती तळमळ असणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रशांत भीमराव पाटील यांचे सिंहाचा वाटा आहे.
शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी आणि पालक यांच्या अथक परिश्रमांचे हे फलित असल्याचे श्री प्रशांत पाटील यांनी नमूद केले.
शाळेत विज्ञान प्रदर्शन, हस्तकला स्पर्धा,खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
शाळेतील ग्रंथालयात विविध विषयांवरील पुस्तके, मासिके आणि संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत.शाळेत संगणक प्रयोगशाळा,विज्ञान प्रयोगशाळा आणि खेळाच्या सुविधा अत्याधुनिक आहेत.डिजिटल क्लासरूम, प्रोजेक्ट आधारित शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी सर्जनशीलता व संशोधनावर भर दिला जातो.
 वार्षिक स्नेहसंमेलन,आनंद मेळावा आयोजित केले जातात.त्याच बरोबर दिवाळी,(दही हंडी) कृष्ण जन्मोत्सव असे अनेक प्रकारचे इव्हेंट आयोजित करण्यात येतात 
प्रचिती शाळेत जवळपासच्या वाडी वस्तीतील काही विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. 
विद्यार्थ्यांसाठी वाचन स्पर्धा,प्रश्नमंजुषा,प्रकल्प कार्य सादरीकरण,सण,उत्सव साजरे करून संस्कृतीची ओळख,क्रिकेट,कबड्डी,फुटबॉल, हॉलीबॉल इ.खेळांचे आयोजन करून राज्यस्तरापर्यंत विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. 
सलग 6 वर्षापासून प्रचिती शाळेचा इयत्ता दहावीचा आणि 12 विचा निकाल 100% लागतो. तसेच विविध स्पर्धा जसे की ओलंपियाड, इंग्लिश मॅरेथॉन, MTS, NTS,रंगोत्सव स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.
प्रचिती शाळेमध्ये कृतीयुक्त आनंददायी शिक्षण, उपचारात्मक अध्यापन,दृकश्राव्य साधनांचा वापर तसेच दर्जेदार,गुणवत्ता पूर्ण शिक्षण,ज्ञानरचनावाद यावर आधारित अध्यापन केले जाते.अद्ययावत ग्रंथालय, संगणकक्ष आणि विज्ञान प्रयोगशाळा आहे तसेच विद्यार्थ्यांसाठी खेळाचे विस्तीर्ण मैदान आणि क्रीडा साहित्य उपलब्ध आहे.शाळेत अत्यंत अनुभवी,कुशल व ऍक्टिव्हिटी द्वारे शिकवणारा शिक्षक वृंद आहे. 
ऍक्टिव्हिटी बेस्ड शिक्षण हा आमच्या शाळेचा केंद्रबिंदू आहे
आजपर्यंत प्राचार्या सह 15 शिक्षकांना शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा उदयजी सामंत(2021),माजी शिक्षण मंत्री मा वर्षाताई गायकवाड (2022), माजी शिक्षण मंत्री मा दिपकजी केसरकर यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा पुरस्कार मिळाले आहेत. त्याच बरोबर CBSE चे Regional Head मा महेश धर्माधिकारी यांच्या हस्ते शिक्षण महर्षी, Star Education Award 2023,खानदेश भूषण हे पुरस्कार मिळाले आहेत.
शाळेत दिवाळी, (दही हंडी) कृष्ण जन्मोत्सव, ग्रॅज्युएशन डे साजरे केले जातात.तसेच किल्ल्यांची स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात.
शाळेच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. या पुरस्कारामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि शाळा भविष्यातील उत्कृष्टता साधण्यासाठी अधिक जोमाने कार्य करेल असा विश्वास श्री प्रशांत पाटील यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध