Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ जानेवारी, २०२५
महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेची ठाणे जिल्हास्तरीय बैठक संपन्न
दिनांक 29/12/2024 रोजी नेरुळ येथे संघटनेची जिल्हास्तरीय बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.संघटनेचे अध्यक्ष कॉ डी एल कराड,उपाध्यक्ष कॉ एल आर राव कॉ तुकाराम सोंजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या संघटनेच्या ठाणे जिल्ह्यातील सभासद यांचे शंका निरसन करण्यात आले. अतिशय तुटपुंज्या वेतनात 2012 पासून आरोग्य मित्र अव्याहत पणे रुग्णसेवा करत आहेत.अगदी कोविड काळात देखील अंगावर दुध पिणाऱ्या बाळाला घरी ठेवून जीवाची पर्वा न करता आमच्या भगिनींनी रुग्णसेवा केली.आज ठाणे जिल्ह्यात योजना राबविणाऱ्या TPA मध्ये बदल होऊन जवळपास अडीच महिन्याचा कालावधी लोटला आहे.जुन्या TPA ने आरोग्य मित्रांची देणी दिलेली नाहीत. नव्याने आलेल्या TPA ने गेल्या दोन महिन्यापासून नियुक्ती पत्र न देता काम करून घेणे सुरु ठेवले आहे.या दोन महिन्यात पूर्ण पगार देखील दिलेला नाही. महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्रांना किमान वेतन कायदा लागू व्हावा, सर्व शासकीय सोयी, सुविधा,लाभ,भत्ते लागू करावेत.TPA बदल झालेल्या जिल्ह्यातील आरोग्य मित्रांना जुन्या TPA ने Gratuity सहित सर्व देणी त्वरित द्यावीत.नव्या TPA ने शक्य तितक्या लवकर नियुक्ती पत्र द्यावेत,गेल्या दोन महिन्याचा पूर्ण पगार द्यावा.अशा सर्व विषयांवर चर्चा झाली.मुख्य कार्यकारी अधिकारी,राज्य आरोग्य हमी सोसायटी यांनी चर्चेसाठी त्वरित वेळ द्यावी असे संघटनेचे म्हणणे आहे.आरोग्य सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून गेली 12 वर्षे आम्ही आंदोलनाचे हत्यार उपसले नाही,असे उपाध्यक्ष कॉ गणेश शिंदे यांनी सांगितले.येत्या 25/01/2025 पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 26 तारखेपासून महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,आणि रुग्णसेवा विस्कळीत झाल्यास याची सर्व जबाबदारी संबंधित TPA आणि शासनाच राहील,असे प्रतिपादन कॉ गणेश शिंदे यांनी केले.सदर बैठकीसाठी उपाध्यक्ष कॉ गणेश शिंदे,राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ शरद चोरमाले,कॉ अनिकेत मोहिते,रुग्णसेवक श्री विशाल जाधव उपस्थित होते. बैठक यशस्वी होणेसाठी आरोग्य मित्र कॉ लंकेश नवाडे,कॉ दीपिका शिलाहार यांनी प्रयत्न केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळगाव ता अमळनेर जि जळगाव येथील जि. प. शाळेत विद्यार्थी नियमित येतात.. शाळाही भरते...पण विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक दिसत नाहीत....म्हणजे...
-
दिनांक 29/12/2024 रोजी नेरुळ येथे संघटनेची जिल्हास्तरीय बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.संघटनेचे अध्यक्ष कॉ डी एल कराड,उपाध्यक...
-
काल मध्ये रात्री अज्ञात चोरट्यांनी साक्री पिंपळनेर सामोडे परिसरात हायवे लगत में लक्ष्मी अग्रो इंडस्ट्रीज सामोडे या कंपनीचे मालक शाम भदाणे सा...
-
अमळगाव ता अमळनेर जि जळगाव येथील जि. प. शाळेत विद्यार्थी नियमित येतात.. शाळाही भरते...पण विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक दिसत नाहीत.... म्हणज...
-
१०८ रुग्णवाहिका असती तर बाळ मेले नसते, मांडळ आरोग्य सेवा कोलमडली* अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथील रुग्णांना शिवीगाळ करणाऱ्या प्राथम...
-
महिनाभरात १०३ जणांना चावा , निर्बीजिकरण रखडले अमळनेर : कुत्रा चावून रेबीज झाल्याने एका ५३ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी शि...
-
अमळनेर : बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या गांधलीपुरा येथील एकावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गुन्हा दाखल कर...
-
धुळे प्रतिनिधी :- धुळे नागपूर महामार्गावरील बाळापूर शिवारात एका हॉटेलच्या बाजुला उभ्या असलेल्या कार चालकाला विटांनी मारहाण करुन त्याच्याकडील...
-
अमळनेर : अवैध रित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर अमळनेर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली असून वाहन अमळनेर पोलीस ठाण्यात जमा कर...
-
तरूण गर्जना रिपोट एकाला सहा टाके पडले, दुसऱ्या गटातर्फेही गुन्हा दाखल अमळनेर : रस्त्यात का उभा राहतो या कारणावरून दोघांनी तिघांना लोखंड...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा