Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २९ जानेवारी, २०२५

आमदार मंजुळा गावित व धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख तुळशीराम गावित यांच्या प्रयत्नाने धाडणे चा शेतकऱ्यांना मिळाला ट्रान्सफॉर्मर.



साक्री तालुक्यातील धाडणे गावाच्या शेतकऱ्यांना आमदार मंजुळाताई व धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख श्री तुळशीराम गावित यांच्या विशेष प्रयत्नमुळे ट्रांसफार्मर मिळाला.सदर ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी जळ बसण्याची शक्यता होती यासाठी आपली अडचण घेऊन संबंधित सर्व शेतकरी यांनी आमदार मंजुळा गावित यांच्याशी संपर्क करत आपले गाऱ्हाने मांडले त्यानंतर आमदारांनी उद्ध पातळीवर एम एस ई बी च्या अधिकाऱ्यांची बोलून तातडीने तिसऱ्याच दिवशी डी.पी.ट्रांसफार्मर उपलब्ध करून दिला यामुळे धाडणे गावातील शेतकरी सुखावले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी आमदार महोदय यांचे अभिनंदन केले धाडणे येथील सबस्टेशन लवकर कार्यान्वित व्हावे व शेतकऱ्यांच्या अडचणी कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी देखील आमदार महोदय प्रयत्नशील आहेत सब स्टेशनचे 50% काम हे पूर्ण झालेले आहे येणाऱ्या वर्षभरात ते काम शंभर टक्के पूर्ण होईल व धन्य लगतच्या चार-पाच खेड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल असे देखील यावेळी आमदार महोदय यांनी शेतकऱ्यांची चर्चा करताना म्हटले यापुढे शेतकऱ्यांचा कुठलाही ट्रान्सफर जळाला तरी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री तुळशीराम गावित यांच्याशी संपर्क करावा अशी देखील आवाहन यावेळी आमदार मंजुळा गावित यांनी केले.यावेळी सर्व शेतकरी श्री चेतनानंद अहिरराव‌‌ (पोलीस पाटील धाडणे)
गोकुळ थोरात, रविन आबा अहिरराव,
अशोक आबा आहिरराव,नवल आनंदा, रतन मोरे,किशोर‌आहिरराव, सुहास अहिरराव,देविदास अहिरराव किरण लाडे,जयेश‌ आहिरराव,महेंद्र अहिरराव,सुखलाल गोयकर,श्रावण जाधव, साहेबराव अहिरराव,आदी शेतकऱ्यानी आ मंजुळा गावित यांचा कामाचे कौतुक केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध