Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ जानेवारी, २०२५
बायकोच्या अनैतिक संबंधातून पोलीस नवऱ्याचा निर्घृण खून
मुंबईत नवीन वर्षाच्या पहाटेच रेल्वे पोलीस हवालदार विजय चव्हाण (४२) यांची दोघांनी गळा दाबून हत्या केली होती. हवालदार विजय चव्हाण यांचा खून करुन त्यांना मृतदेह ट्रान्स हार्बर मार्गावरील रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलपुढे रेल्वे रुळांवर फेकला. मात्र मोटारमनच्या सर्तकर्तमुळे आरोपींचा बनाव समोर आला. मृतदेह सापडल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा तपास सुरु केला होता. त्यानंतर आता याप्रकरणात धक्कादायक असा खुलासा झाला आहे.
वाशी रेल्वे पोलिसांनी रेल्वे पोलीस हवालदार विजय चव्हाण यांच्या हत्येचा उलगडा केला आहे. याप्रकरणी विजय चव्हाणची पत्नी आणि तिच्या कथित प्रियकरासह चार जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. पनवेल जीआरपीमध्ये पोस्ट केलेले हेड कॉन्स्टेबल विजय रमेश चव्हाण हे १ जानेवारी रोजी घणसोली आणि रबाळे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत आढळून आले होते. चव्हाण यांची पत्नी पूजा चव्हाण (३५) हिचा प्रियकर भूषण निंबा ब्राह्मणे (२९) याने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पूजा चव्हाण आणि भूषण याने एकमेकांशी लग्न करण्यासाठी विजय चव्हाणच्या हत्येचा कट रचला होता.
चौघांना केली अटक
पनवेल जीआरपीमध्ये तैनात असलेले चव्हाण हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून ते नवी मुंबईतील घणसोली गावातील चिंचाडी परिसरात राहत होते. ही घटना घडली त्यावेळी चव्हाण हे कर्तव्यावर नव्हते आणि साध्या वेशात होते. चव्हाण हे दारूच्या नशेत असल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले होते. दोन्ही आरोपींनी त्यांना जास्त प्रमाणात दारु पाजली आणि नंतर त्यांची हत्या केल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांना होता. मात्र तपासानंतर यामागे त्यांची पत्नी असल्याचे उघड झालं. पोलिसांनी तीन दिवसांत ब्राह्मणे, पूजा, प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण, प्रवीण आबा पानपाटील यांना अटक केली.
गाडीमध्ये केला खून
याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केला. रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या देखरेखीखाली पोलRस उपायुक्त पाटील यांनी अनेक तपास पथके तयार केली. पाच दिवसांच्या तपासानंतर, ब्राह्मणेने कट रचल्यानंतर प्रवीण पानपाटीलने विजय चव्हाण यांना न्यू ईअरच्या पार्टीसाठी बोलावले. विजय चव्हाण आल्यानंतर त्यांनी धीरजच्या इको कारमध्ये त्यांच्यासोबत पार्टी केली. त्यानंतर रात्री ११.३० च्या सुमारास चव्हाण हे मद्यधुंद अवस्थेत असताना ब्राह्मणे आणि पानपाटील यांनी कारमध्ये दोरीने त्यांचा गळा आवळून खून केला.
या सगळ्या प्रकारानंतर धीरज घाबरला. त्यामुळे विजय चव्हाण यांचा मृतदेह रेल्वे रुळावर घेऊन जात असताना भूषण ब्राह्मणेने धीरजला तिथून जायला सांगितले. त्यानंतर धीरज मध्यरात्री १.३० च्या सुमारास थेट त्याच्या घरी आला आणि त्याने आपली कार पार्क करुन झोपी गेला. यानंतर भूषण ब्राह्मणे आणि पानपाटील हे चव्हाण यांच्या मृतदेहासोबत रेल्वे रुळांजवळ सुमारे चार तास लपून बसले होते आणि पहिली गाडी जाण्याची वाट पाहत होते. पहिली लोकल ट्रेन आली तेव्हा त्यांनी चव्हाण यांचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला आहे असं दाखवण्यासाठी त्यांचा मृतदेह रुळांवर फेकून दिला. मात्र, ट्रेनच्या मोटरमनने त्यांना पाहून ट्रेन थांबवली आणि नंतर रेल्वे कंट्रोल रूमला माहिती दिली.
व्हिडीओ कॉलमध्ये सापडला आरोपी
तपासादरम्यान, पोलिसांनी चव्हाण यांचा मोबाइल फोन तपासला असता घणसोली परिसरातील एका अंडी विक्रेत्याला शेवटचे गुगल पे पेमेंट केल्याचे समोर आलं. पोलीस जेव्हा त्या दुकानदाराकडे गेले तेव्हा त्यांना शेजारीच एक वाईन शॉप दिसले. चौकशी केली असता चव्हाण यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती तिथे आल्याचे वाईन शॉपवाल्याने सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासत आरोपींचा माग काढला. याशिवाय चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्याला शेवटचा व्हिडिओ कॉल करून त्या रात्री पार्टीला जात असल्याची माहिती दिली होती. या व्हिडिओ कॉलमध्ये धीरज हा मागे दिसत होता.
दुसरीकडे, पोलिसांनी चव्हाण यांच्या पत्नीचे फोन कॉल डिटेल्स देखील तपासले आणि त्यामध्ये तिने धीरजसोबत बऱ्याचवेळा फोनवरुन संभाषण केल्याचे आढळले. पोलिसांनी धीरजच्या उरण येथील इमारतीचे सीसीटीव्हीही तपासले असता तो पहाटे दीड वाजता गाडी पार्किंग करताना दिसला. यावरून धीरजवर पोलिसांचा संशय बळावला. चौकशीदरम्यान, धीरजने इतर आरोपींची नावे पोलिसांना सांगितली. धीरजने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले की ती गाडी त्याची नव्हती. मात्र ब्राह्मणेच्या चौकशीनंतर संपूर्ण कट उघड झाला.
पत्नीबाबत धक्कादायक खुलासे
तपासात पूजा विजय चव्हाणला कंटाळली होती. दारू पिण्यासोबतच त्याला वैश्यांना भेटण्याचे व्यसनही होते, असे तपासात उघड झाले आहे. अनेकदा हिंसक होऊन तो पत्नीवर हल्ला देखील करत असे. पूजाने तिचा प्रियकर ब्राह्मणेला याची माहिती दिली आणि त्यांनी विजयला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पूजाचा चुलत भाऊ धीरज आणि ब्राह्मणेचा मित्र पानपाटील याला या कटात सहभागी करुन घेतले. दुसरीकडे पूजाचे लग्नापूर्वी अनेक संबंध असल्याचे विजय चव्हाण यांना समजले होते आणि ती एकदा तिच्या आईच्या भावासोबत म्हणजे (मामा) सोबत पळून गेली होती असेही तपासात समोर आले आहे.
पोलीस चौकशीत ब्राह्मणे व्यतिरिक्त पूजाचे काही काळ धीरज सोबत ही संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विजय चव्हाण यांचे मुळ गाव वर्षी ता.शिंदखेळा हे होते आणि ह.मु अमळनेरला होते नोकरी निमित्त मुंबईला पोलिस दलात होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
मुंबईत नवीन वर्षाच्या पहाटेच रेल्वे पोलीस हवालदार विजय चव्हाण (४२) यांची दोघांनी गळा दाबून हत्या केली होती. हवालदार विजय चव्हाण यांचा खून कर...
-
साक्री-साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स्पोनि,जयेश यखलाणे यांना गुप्तबातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती की, साक्री पोलीस स्टे...
-
4 कोटी निधीतून उभारले उपकेंद्र,अनेक गावांचा विजेचा प्रश्न सुटला,शेती उद्योगालाही मिळणार बळकटी अमळनेर -विधानसभा मतदारसंघातील सारबेटा येथे 4 क...
-
H M P V विषाणू व्हायरस संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात अलर्ट जारी होण्याची शक्यता.....मुंबई HMPV हा चीनमध्ये पसरलेला ह्यूमन मेटा प्युमो व्हायरस संसर्ग भारतात पोचला असून बंगलोर मध्ये एका आठ महिन्याच्या मुलीला याची लागण झाली आह...
-
तरूण गर्जन रिपोट . समाज उद्धाराचे कंकण बांधणाऱ्या सावित्रीआईंनी स्रियांना कर्तृत्वाच्या आकाशात झेप घेण्यासाठी शिक्षणाचे बळकट पंख दिले ...
-
शिरपूर/प्रतिनिधीः- शिरपूर तालुका पोलिसांनी अवैद्य रित्या होत असलेले सुगंधित तंबाखू वाहतूकीवर कारवाई करीत वाहनासह ३० लाख रुपयांचा मुद्देमाल ह...
-
१०८ रुग्णवाहिका असती तर बाळ मेले नसते, मांडळ आरोग्य सेवा कोलमडली* अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथील रुग्णांना शिवीगाळ करणाऱ्या प्राथम...
-
दिनांक 29/12/2024 रोजी नेरुळ येथे संघटनेची जिल्हास्तरीय बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.संघटनेचे अध्यक्ष कॉ डी एल कराड,उपाध्यक...
-
काल मध्ये रात्री अज्ञात चोरट्यांनी साक्री पिंपळनेर सामोडे परिसरात हायवे लगत में लक्ष्मी अग्रो इंडस्ट्रीज सामोडे या कंपनीचे मालक शाम भदाणे सा...
-
अमळगाव ता अमळनेर जि जळगाव येथील जि. प. शाळेत विद्यार्थी नियमित येतात.. शाळाही भरते...पण विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक दिसत नाहीत....म्हणजे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा