Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ जानेवारी, २०२५

शिरपूर तालुका पोलिसांनी अवैद्य रित्या होत असलेले सुगंधित तंबाखू वाहतूकीवर कारवाई



शिरपूर/प्रतिनिधीः- शिरपूर तालुका पोलिसांनी अवैद्य रित्या होत असलेले सुगंधित तंबाखू वाहतूकीवर कारवाई करीत वाहनासह ३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी चालकावर शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना माहिती मिळाली होती. माहिती नुसार
गाडी नंबर एन एल ०१ ए एच ५९८८ महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली सुगंधीत तंबाखू जन्य पदार्थ भरला होता. सदर गाडी दिनांक ३ रोजी रात्री १ वाजेपासून मुंबई आग्रा महामार्गावरील ओम साईराम ढाब्याजवळ संशयास्पद स्थितीत उभी आहे.पोलीस सदर वाहनाच्या ठिकाणी गेले. तेथे गाडी चा चालक साऊद फरमीन खान रा. सारेकलान ता. तिजारा जि. अलवर (राजस्थान) हा गाडीत व्यवस्थित सांगत नव्हता. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात सुगंधित तंबाखू आढळून आली.

या कारवाईत शिरपूर तालुका पोलिसांनी ५ लाख ४० हजार रुपये किमतीचा हंस छाप तंबाखु चे एकुण ४ हजार ५०० पाकीट, १३ लाख २० हजार रुपये किमतीचा हंस छाप तंबाखू चे एकुण ११ हजार पाकीट व १५ लाख रुपये किमंतीचा कंटेनर असा एकूण ३३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपूर तालुका पोलीस ठाणे ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चं कलम २६ (२) (४) २७ (३) (डी )२७ (३) (३) ३०(२) (ए) चे उल्लंघन कलम ५९ (आय) सह भारतीय न्याय संहिता २०२३ च कलम १२३,२२३,२७४, २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोसईसुनिल वसावे करीत आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपुर, सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई सुनिल वसावे, संतोष पाटील, संदिप ठाकरे, योगेश मोरे, संजय भोई, स्वप्निल बांगर, जयेश मोरे, सुनिल पवार, भुषण पाटील, अल्ताफ मिर्झा, धनराज गोपाळ, इसरार फारुकी, सागर कासार यांनी केली आहे.

शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे रुजू झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर अवैद्य धंद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. हिरे यांच्या धाकामुळे अवैध धंदे करणारे धास्तावले आहेत. त्यामुळे या भागातील जनतेनेही समाधान व्यक्त केले आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी आला म्हणजे अवैद्य धंद्यांवर संक्रांत येत असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध